नवी दिल्ली । भारतात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर ५० टक्के असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. देशातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे वक्तव्य केलं.
देशामधील राज्यांतील कोरोनाची स्थिती मला जाणून घ्यायची आहे. तसंच राज्यांमधली परिस्थिती काय आहे? त्याबाबत मला तुम्हा सगळ्यांचे सल्ले हवेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. तसंच त्यामुळेच पुढची रणनीती ठरवण्यात येईल असंही मोदी यांनी स्पष्ट केलं. कोरोनामुळे जे काही मृत्यू झालेत ती दुःखद बाब आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
The recovery rate has gone above 50% in India: Prime Minister Narendra Modi. #COVID19 pic.twitter.com/C0Odwfw25E
— ANI (@ANI) June 16, 2020
दरम्यान, आपण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात जेवढे यशस्वी होऊ तेवढीच आपली अर्थव्यवस्थाही सुधारेल असा विश्वास पंतप्रधान मोदींनी यावेळी बोलून दाखवला. याचसोबत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यशस्वी झाल्यास सरकारी कार्यालयं, खासगी कार्यालं, मार्केट उघडू शकतील. दळणवळणाची साधनं सुरु होतील आणि तेवढ्याच रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील असंही मोदींनी आजच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत म्हटलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”