औरंगाबाद – राज्य निवडणूक आयोगाकडे महानगरपालिका प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा आज सादर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्य शासनाने औरंगाबाद महापालिकेची निवडणूक आता बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार घेण्याचे ठरवले आहे. त्यातच वाढलेल्या लोकसंख्येनुसार नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय देखील राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार नगरसेवकांची संख्या वाढवून प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने महापालिकेला दिले आहेत.
पुर्वी मनपात 115 नगरसेवक होते. आता ही संख्या आकाराने वाढून 126 इतकी होणार आहे. त्यामुळे अस्तित्वातील वॉर्डांचे क्षेत्रफळ कमी करून त्यात 115 वॉर्डांमध्ये 126 वा तयार करण्याचे आव्हान मनपासमोर होते. आता आज निवडणूक आयोगाकडे हा प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचे समजते.