सातारा प्रतिनिधी | सह्याद्री व्याघ्र संवर्धन प्रकल्पाची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्यात आली. संवर्धनमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. संबंधित अधिकारी, पदाधिकारी आणि सचिव यांच्यासोबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही या बैठकीला उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे अशी मागणी केली आहे.
यावेळी देसाई यांनी प्रकल्प आणि पर्यटन विकासाच्या संदर्भात त्यांनी काही मुद्दे मांडले. तसेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे अशी मागणी ती याआधीपासूनच करत आहेत. या बैठकीतही त्यांनी ही मागणी केली. तसेच याबाबत शिफारसही केली. देसाई म्हणाले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत चर्चा करून लवकरच हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर येईल आणि नामविस्तारावर शिक्कामोर्तब होईल असा मला विश्वास आहे.
दरम्यान तालुक्यातील काही ठिकाणे पर्यटनाच्या दृष्टीने नव्याने विकसित करण्याचे ठरले असल्याचे त्यांनी सांगितले. घाटमाथ्यावर कोकण दर्शन विकसित करणे, वॉकिंग ट्रॅक करणे आदी गोष्टी केल्या जाणार असून त्यासाठी ६ कोटी रुपयांची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.