व्यक्तीच्या संपत्तीमध्ये पत्नी आणि मुलांसोबतच आई-वडिलांचाही समान हक्क; जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | जिल्हा सत्र न्यायालयाने पोटगी प्रकरणी एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या निर्णयामध्ये न्यायालयाने म्हटले आहे की, व्यक्तीच्या संपत्तीमध्ये पत्नी आणि मुलांसोबत आई वडिलांचाही समान हक्क असणार आहे. मुलाच्या उत्पन्नाचा आई-वडिलांनाही लाभ मिळायला हवा. वृद्धापकाळामध्ये आई वडिलांना आधार असायला हवा.

पोटगी प्रकरणांमध्ये तीस हजारी जिल्हा सत्र न्यायालयाने या संदर्भामध्ये सुनावणी केली. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश गिरीश कथपलिया यांनी वरील निर्णय दिला आहे. यामध्ये एका महिलेने या संदर्भामध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये पत्नीने असे म्हटले होते की, पतीचे मासिक उत्पन्न 50 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. तरीही पती तिच्यासाठी आणि मुलांसाठी फक्त दहा हजार रुपये पोटगी देतो. यासोबत, पतीने प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटले होते की, त्याचे उत्पन्न 37 हजार रुपये महिना असून, त्यामध्ये पत्नी, दोन मुले आणि वृद्ध आई-वडिलांची काळजी त्याला घ्यावी लागते. यामुळे दहा हजार रुपयापेक्षा जास्त पोटगी पत्नी आणि मुलांना देणे त्याला शक्य नाही.

न्यायालयाने यामध्ये सुनावणी करताना पतीच्या उत्पन्नाची सहा भागात विभागणी केली. यातील एक भाग पत्नीला, एक मुलाला आणि आई वडील यांना एक भाग देण्यात आला. पत्नी आणि मुलाच्या वाट्याला यामध्ये बारा हजार पाचशे रुपये येत होते. दर महिन्याच्या दहा तारखेला सर्वांना पतीने पोटगीची रक्कम वाटावी. असे न्यायालयाने पतीला सांगितले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.