‘त्या’ घोटाळ्यातील मास्टर माईंड चा शोध सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शहरातील पहाडसिंगपुरा भागातील डीकेएमएम महाविद्यालयातील मनपाच्या लसीकरण केंद्रावर 16 नागरिकांना बोगस लस प्रमाणपत्र दिल्याचे नुकतेच उघडकीस आले. या प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणातील मास्टरमाइंड व्यक्तीचा आता पोलीस तसेच मनपाकडून शोध घेण्यात येत आहे. मात्र पोलिसांनी अद्याप लाभार्थ्यांना हात लावलेला नाही. गरज पडली तर लाभार्थ्यांना ही विचारावे लागणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

डीकेएमएम महाविद्यालयाच्या आवारात मनपाच्या लसीकरण केंद्रात शनिवारी 16 जणांनी लस घेतल्याचे उघडकीस आले. मात्र प्रत्यक्षात हे लाभार्थी लसीकरण केंद्रात आलेच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. रजिस्टरवर त्यांची नावे देखील नव्हती, मात्र या केंद्रावरील लाभार्थ्यांच्या यादीत अचानक 55 वरून 71 अशी वाढ झालेली दिसून आली. या सर्व प्रकरणामुळे मागील दोन दिवसापासून हे लसीकरण केंद्र बंद करण्यात आले आहे.

लसीकरण केंद्रावरील कोबी ॲपचा युजर नेम पासवर्ड चोरून 16 नावे कोणी टाकली या मास्टरमाइंड व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे. या केंद्रावरील सर्व कर्मचाऱ्यांची मनपाने कसून चौकशी केली आहे. त्यामध्ये प्राथमिक रित्या कोणी दोषी आढळून आला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे बाहेरील व्यक्तीने कोयनेचा डिवाइस चोरून घोटाळा केला असावा, असा अंदाज मनपा अधिकार्‍यांनी वर्तविला आहे.

Leave a Comment