हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तीन वेगवेगळ्या विचारांच्या पक्षांचे आमचे सरकार असले तरी तिन्ही पक्षांनी एका विचाराने हा अर्थसंकल्प मांडला आहे. पैशांचे सोंग न करता राज्याला प्रगतीकडे नेण्याचा संकल्पच आम्ही या अर्थसंकल्पातून केला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नैतृत्वातील महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार वचनपूर्तीच्या दिशेने ठोस वाटचाल करीत असून अर्थमंत्री अजित पवार यांनी आज मांडलेला अर्थसंकल्प महाराष्ट्रातील जनतेला दिसाला देणारा अर्थसंकल्प असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले. तिन्ही पक्षांनी मिळून सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प मांडला असून समाजातील प्रत्येक घटकाला यात न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला आहे. शेती, शिक्षण, पाणी, उद्योग अशा सर्वच बाबतीत महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी यात ठोस पावले उचलण्यात आली आहेत. त्यामुळेच एका विचाराने तयार झालेल्या अर्थसंकल्पाने विरोधी पक्षाची चिंता मिटलेली असेल, असे म्हणायला हरकत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
दरम्यान, अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यांनतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ”सरकारचा अर्थसंकल्प हे केवळ राजकीय पोकळ भाषण अशी तिखट प्रतिक्रिया दिली. ‘अर्थसंकल्पाच्या नावाखाली अजित पवार यांनी पोकळ भाषण केलं. अर्थसंकल्पीय भाषणामध्ये कुठलीही आकडेवारी नव्हती. राज्याच्या आर्थिक परिस्थितीचं विश्लेषण नव्हतं. नवीन वर्षात काय अपेक्षित आहे. किती तूट राहील किंवा अधिक्य राहील अशा कुठल्याही गोष्टी या अर्थसंकल्पात नाहीत, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधत महाविकास आघाडीच्या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.
the-three-parties-proposed-the budget-with-one-thought-chief-minister-uddhav -thackeray