आता सरकारी आणि खाजगी कार्यालयामधेही मिळणार लस; ‘ही’ आहे अट

corona vaccine
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | दुसऱ्या लाटेमध्ये करोणाने मोठ्याप्रमाणात थैमान घातले आहे. या लाटेमध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे सरकारने लसीकरण अजून मोठ्या प्रमाणात हाती घेतल्याचे दिसून येते. ही लस लोकांना लवकरात लवकर आणि सोप्या पद्धतीने मिळावी यासाठी सरकारने अजून एक पर्याय समोर आणला आहे. यामध्ये आजचा सरकारी आणि खाजगी कार्यालयातही लस उपलब्ध होणार आहे. फक्त त्या कार्यालयांमध्ये 100 पेक्षा जास्त कर्मचारी असणे बंधनकारक आहे.

बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्य सरकारांना याबाबत सूचना दिली आहे. येत्या 11 एप्रिल पासून सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये ही लस उपलब्ध होणार आहे. ज्या कार्यालयांमध्ये शंभर पेक्षा जास्त कर्मचारी आहेत ते कार्यालय यासाठी पात्र ठरणार आहे. या कार्यालयातील 45 वर्ष वया पेक्षा जास्त लोकांना ही लस प्राप्त होणार आहे.

सरकारी आणि खाजगी कार्यालयामध्ये लसीकरण टिम हे लसीकरण राबवणार आहे. यानंतर यांची नोंद कोविन वेबसाईटवर जोडली जाणार आहे. लस देताना एक गोष्ट लक्षात घेतली जाईल. ती म्हणजे, कार्यालयाच्या आसपास मोठे रुग्णालय असणे गरजेचे आहे. जेणेकरून एखाद्या व्यक्तीला त्रास झाल्यास त्याला लवकरात लवकर उपचार मिळणे शक्य होईल.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group