हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या पिडीत तरुणीने भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर चित्रा वाघ यांनी थेट पत्रकार परिषद घेत पिडीतेचे आरोप फेटाळले. तसेच यावेळी त्यांनी पीडित तरुणीच्या भेटीनंतरचा संपूर्ण घटनाक्रम प्रसारमाध्यमांसमोर मांडत माझी कोणतीही चौकशी करा, मी तयार आहे असे खुल आव्हान राज्य सरकारला दिले.
चित्रा वाघ म्हणाल्या, 18, 19 तारखेला पीडितेची आणि भेट झाली होती. तिने सगळी माहिती मला सांगितली. त्यावेळी एकटी मुलगी लढतेय आणि कोणीतरी तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेतेय म्हणून तिच्यासोबत मी उभी राहिली. ही माझी चूक झाली का? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला.
ताई माझी तब्बेत बरी नाही, मला चालता येत नाही मला हॉस्पिटलमध्ये उपचार करायचे आहेत अशी विनंती त्या मुलीने केली तेव्हा आमच्या वैद्यकीय आघाडीच्या डॉक्टर तिला ससून रुग्णालायात ऍडमिट करायला गेल्या. तिला तिथे ऍडमिट व्हायचं नव्हतं मग ती स्वतः जहांगीर हॉस्पिटलला गेली आणि तिथून तिने मला फोन केला अन म्हणाली कि ताई डिपॉझिट साठी पैसे नाहीत, माझे पैसे भरा. जहांगीर हॉस्पिटल मधेही आमच्या डॉक्टर ताई होत्या आणि त्यांनी तिथे पैसे भरले आणि त्या मुलीवर उपचार केले हि आमची चूक झाली का असे चित्रा वाघ यांनी म्हंटल
ती मुलगी तेव्हा अडचणीत असताना राज्यातील कोणताही पक्ष आणि कोणतीही महिला तिच्या मदतीला आली नाही. पण आज तिने चित्रा वाघवर आरोप करताच राज्यातील काही महिला तिच्या समर्थनार्थ उभ्या राहिल्या, मग इतका दिवस तुम्ही झोपला होतात का असा सवाल चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेच्या नेत्या रुपाली चाकणकर याना नाव न घेता केला
लोकांना जर मदत करायची नसेल तर करू नका पण चुकीचे आरोप करू नका. आज चित्रा वाघविरोधात आरोप केल्यानंतर महिला तिच्यासाठी धावून आल्या. सगळे खडबडून जागे झाले. माझा आवाज बंद कराल, हा तुमचा गैरसमज आहे. जिथं बोलवाल तिथं मी चौकशीसाठी यायला तयार आहे.असे आव्हान त्यांनी सरकारला दिले.
मला जे जे करता आलं ते मी केले. मी त्या मुलीला मदतच केली मात्र ती मुलगी आता असे का बोलते, कोणत्या मजबुरीने बोलतेय मला माहित नाही, त्या मुलींबाबत देखील माझी कोणतीही तक्रार नाही.मी तिला दोष देणार नाही परमेश्वर तिचे भल करो. ती एकटी लढतोय आणि या नराधमांपासून तिला न्याय मिळावा म्हणून मी तिच्या सोबत होती असे चित्रा वाघ यांनी म्हंटल. तसेच महराष्ट्रातील कोणत्याही महिलेला काहीही गरज लागली तर चित्रा वाघ कायम त्यांच्या सोबत असेल असेही चित्रा वाघ यांनी सांगितले