कराड उत्तरमधील नडशीत काॅंग्रेसचा विजय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील उत्तर विधानसभा मतदार संघातील नडशी गावच्या वि. का. स. सेवा सोसायटी निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात यांनी त्यांचे नेतृत्वातील सिद्धेश्वर विकास पॅनेलने माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली 13 जागापैकी 11 जागा जिंकून सोसायटीवर आपले वर्चस्व अबाधित राखले आहे. यावेळी सिद्धेश्वर विकास पॅनेलचे प्रमुख जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात यांच्यासह सर्व सदस्यांचा माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या सर्व उमेदवारांनी आज माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी आण्णा थोरात, निवृत्ती घोलप, आनंदराव थोरात, शंकर थोरात, भीमराव थोरात, विठ्ठल रविढोणे, हिंदुराव थोरात, आनंदराव थोरात, आनंदराव थोरात, लक्ष्मण थोरात, उत्तम कदम, युवराज थोरात, भीमराव थोरात, संपत थोरात, शशिकांत थोरात, शंकर थोरात, आप्पासो थोरात, भीमराव थोरात, अशोक कदम, गणेश थोरात, अनिल थोरात, अधिकराव थोरात, अनिल थोरात, सुहास थोरात आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी विजयी उमेदवारांना मार्गदर्शन करताना माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, नडशी गावाने युवक व अनुभवी या सर्वाना सोबत घेऊन निवास थोरात यांच्या नेतृत्वात पॅनेल उभा केले व ते निवडूनही आणले, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. गावची सहकारी सोसायटी हा गावाचा आर्थिक कणा असतो त्याची जबाबदारी योग्य व निपक्षपाती लोकांकडे असेल तर सर्व कारभार सुद्धा पारदर्शी राहतो. म्हणूनच नडशी सोसायटी च्या सर्व विजयी उमेदवारांनी अत्यंत पारदर्शकपणे सोसायटी चालवावी व त्याचे काम आदर्शवत करावे.