हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजस्थानमधील बीकानेर जिल्ह्यातील श्रीडूंगरगड परिसरातील सालासर गावात एक आश्चर्यकारक भौगोलिक घटना घडली आहे, हे पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित होत आहते.या घटनेमागील कारण मात्र संपूर्ण जिल्ह्यात एक कोडेच बनून राहिले आहे. येथे एक शेत जमिनीत गेले. शेतातील माती अचानक ढासळायला लागली आणि तेथे २०-२५ फूट खोल खड्डा पडला. या विचित्र घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियामध्येही खूप व्हायरल होत आहे.
बीकानेरच्या सालासर गावात जमीन सरकली
मिळालेल्या माहितीनुसार सालासर गावात रेल्वे रुळाजवळील एका शेतकर्याच्या शेतात सकाळी अंदाजे दहा वाजता जमीन अचानक सरकायला लागली.हे कळताच जवळच्याच शेतात काम करणारे लोक तेथे जमा झाले.लोकांच्या डोळ्यादेखत एक मोठा खड्डा तयार झालेला होता, जो सुमारे २५ फूट खोल होता.ही माती कशी सरकली ते एक रहस्यच आहे.
तपासनंतरच उघड होईल खरे कारण
गाव सालासर येथे एक भौगोलिक घटना घडली असल्याची माहिती पटवारी शंकर लाल जाखड़ यांनी दिली. जमिनीतच खोल विवर तयार झाला आहे,मात्र भूकंपसदृश घटना घडल्या नाहीत. यासंदर्भात अधिका्यांना जागरूक केले आहे. या घटनेचे खरे कारण केवळ विशेष तपासातच कळू शकेल.
अशी घटना ३ वर्षांपूर्वीही घडली आहे
जमीन सरकण्याची ही काही पहिली घटना नाही. तशाच प्रकारे येथे ३ वर्षांपूर्वीही जमीन सरकली होती. त्यावेळी येथे ६० फूट खोल खड्डा झाला होता, जो नंतर शेताच्या मालकाने स्वतःनेच भरीव टाकून भरला. त्या वेळी बर्याच चमूने या विचित्र घटनेची तपासणी केली होती, परंतु कोणतेही कारण मात्र समोर आला नव्हता आणि आता पुन्हा एकदा तशीच घटना घडली आहे.
भूगर्भातील पाणी गोड होते
बीकानेरचा हा प्रदेश वाळवंटी प्रदेश आहे. तीन वर्षांपूर्वी येथे भूगर्भातील पाणी क्षारयुक्त होते,परंतु जमीन सरकल्याच्या घटनेनंतर येथिल हातपंप व इतर भूजल स्त्रोतांमधून गोड पाणी येऊ लागले, जे गावकऱ्यांसाठी चमत्कारापेक्षा कमी नव्हते. त्यानंतरच येथे शेंगदाण्याचे उत्पादनही प्रचंड प्रमाणात होऊ लागले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.