महिलेने कारचा अचानक ब्रेक दाबला अन् तीन कार एकमेकांवर आदळल्या

Accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

औरंगाबाद – नवीन गाडी घेऊन जाणार या महिलेने अचानक ब्रेक दाबल्याने मागून येणाऱ्या तीन कार एकमेकांवर आदळून अपघात झाला. यात एका कारचे मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने या विचित्र अपघातात जीवितहानी झाली नाही.

शहरातील उच्च न्यायालयाकडून सेवन हिल कडे जाणाऱ्या मार्गावर काल रात्री एक महिला बिगर नंबरची नवीन कोरी कार चालवत होती. या कारच्या मागे आणखी तीन कार होत्या. त्या महिलेने कारचा अचानक ब्रेक दाबला. त्या पाठीमागून येणाऱ्या तीन कार एकमेकांवर आदळल्यावर विचित्र अपघात झाला. ती महिला घाबरून गेली व तिने घटनास्थळी न थांबता कारसह पळ काढला.

कारच्या मागे तुकाराम व्यवहारे यांच्या एमएच 20 एमवाय 2388 या कारच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले. त्या पाठीमागे असलेल्या एमएच 20 ईसी 0021 या कारच्या समोरील डाव्या बाजूचे नुकसान झाले. तर सर्वात शेवटी असलेल्या एमएच 20 बीवाय 0882 बाजूचे नुकसान झाले.