मासे खाल्ल्याने झाला धोकादायक संसर्ग; महिलेचे हातपाय तोडावे लागले, नेमकं काय घडलं?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्ही मासे (Fish)खाण्याचे शौकीन असाल आणि मासे तुम्हाला खूप आवडत असतील तर त्यामुळे होणारे नुकसानही जाणून घेणं गरजेचं आहे. माशात चांगल्या प्रमाणात पोषक तत्वे, ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन डी मिळत असले तरी एका महिलेचे मासे खाल्ल्याने मोठं नुकसान झालं आहे. मासे खाल्ल्यामुळे महिलेला तिचे हातपाय कापावे लागले. नेमकं असं घडलं तरी कस? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

लॉरा बराजस असं या अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे राहणाऱ्या महिलेचे नाव असून मासे खाणे अत्यंत महागात पडले आहे. मासे खाल्यामुळे झालेल्या संसर्गमुळे लाराचे हात आणि पाय डॉक्टरांच्या सल्यानुसार कापावे लागले. 40 वर्षीय लॉरा बराजसने तिलापिया प्रजातीचे मासे खाल्ले होते. माहितीनुसार , लॉराने अर्धवट शिजवलेले मासे खाल्ले होते, त्यानंतर लॉराला एका बॅक्टेरियाचा संसर्ग झाला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्टरांना समजले की लॉराचे दोन्ही हात आणि पाय पूर्णपणे बॅक्टेरियाने संक्रमित झाले आहेत. अशा परिस्थितीत लॉराचा जीव वाचवण्यासाठी त्यांना तिचे सर्व हात आणि पाय कापावे लागले.

का ठरले मासे जीवघेणे :

लॉराच्या एका मैत्रिणीच्या सांगण्यावरून लॉराने बाजारातून तिलापीया प्रजातीचे मासे खाण्यासाठी आणले होते. त्यानंतर तिने ते खाण्याच्या घाई मध्ये चांगल्या पद्धतीने साफ केले नाहीत व अर्धवट शिजवले. त्यामुळे त्यामध्ये असलेल्या संसर्गजनक जिवाणू विब्रियो वल्निफीकसचा अन्नातून नायनाट होऊ शकला नाही. त्यामुळे लॉरा ला ह्या जिवाणूचा संसर्ग झाला. त्यानंतर तो संसर्ग वाढत संपूर्ण शरीरात पसरला जिवाणूचा संसर्ग किडनी पर्यंत पोहचला होता. ओठ, हात आणि पाय काळे पडायला लागले होते. लवकर उपचार झाले नसते तर लॉराचा जीव देखील गेला असता . तब्बल एक महिना लॉरा दवाखान्यात उपाचार घेत होती त्यानंतरच ह्या संसर्गातून वाचू शकली .

विब्रियो वल्निफिकस ( Vibrio vulnifucus ) जिवाणू नेमका आहे तरी काय?

1976 मध्ये अमेरिकेतील Center for disease control ( CDC) मध्ये Vibrio vulnifucus हा जिवाणू पहिल्यांदा रक्ताच्या नमुन्यातून वेगळा केला गेला. समुद्रातील पाण्यात Vibrio vulnifucus हा जिवाणू मोठ्या प्रमाणात आढळतो. मुख्यत्वे मेक्सिको आणि अमेरिकाच्या पॅसिफिफ समुद्रात ह्याचे प्रमाण अधिक आहे.Vibrionaceae ह्या फॅमिली मधून हा जिवाणू येतो. समुद्री मासे खाल्यामुळे झालेल्या संसर्गमध्ये मुख्यत्वे Vibrio vulnifucus ह्या जिवाणू कारणीभूत असतो . मुख्यत्वे मासे साफ करताना हातावर असलेल्या जखमेतून ह्याचा संसर्ग होऊ शकतो . तसेच अर्धवट शिजवलेल्या मास्यातून हा संसर्ग पसरू शकतो . Vibrio vulnifucus या जिवाणूवर असलेल्या संरक्षित कवचामुळे मानवी प्रतिकारशक्ती याजिवाणूच्या विरोधात पुर्ण क्षमतेने काम करू शकत नाही.

काय आहेत लक्षणे ?

या जिवाणूच्या संसर्गमुळे तुम्हाला जुलाब होऊ शकतात, अनेकदा पोटात मुरड येणे, मळमळ, उलट्या, ताप आणि थंडी वाजून येणे ही लक्षणे दिसून येतात. सहसा ही लक्षणे जिवाणू शरीरात गेल्याच्या 24 तासांच्या आत उद्भवतात आणि सुमारे 3 दिवस ही लक्षणे दिसतात . यात गंभीर आजार दुर्मिळ आहे पण सामान्यत: कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांमध्ये आजार गंभीर होतो. Vibrio vulnifucus जिवाणूमुळे त्वचेचा संसर्ग देखील होऊ शकतो जेव्हा एखादी उघडी जखम खारट पाणी किंवा खाऱ्या पाण्याच्या संपर्कात येते, तेव्हा हा संसर्ग होऊ शकतो .

Vibrio vulnifucus जिवाणूच्या संसर्गपासून कसे वाचू शकता :

•कच्चे किंवा कमी शिजलेले ऑयस्टर किंवा इतर शेलफिश खाऊ नका. ते खाण्यापूर्वी शिजवा.

• मासे हाताळ्यानंतर आपले हात नेहमी साबणाने आणि पाण्याने धुवा.

• खाऱ्या पाण्यात असताना कापण्यापासून आणि खरचटण्यापासून तुमचे संरक्षण करू शकतील असे कपडे आणि शूज घाला.

• कच्चे सीफूड हाताळताना संरक्षक हातमोजे घाला.

• मासे शिजवताना चांगल्याप्रकारे उच्च तापमानावर शिजवा.

• जखम असताना मासे हाताळने टाळा.

काय आहेत उपचार पद्धती :

सौम्य प्रकरणांमध्ये उपचार आवश्यक नाही, परंतु अतिसारात rehydration साठी रुग्णांनी भरपूर पाणी प्यावे. प्रतिजैविकांमुळे (antibiotics) आजाराची तीव्रता किंवा कालावधी कमी होत असल्याचा कोणताही पुरावा नसला तरी, ते कधीकधी गंभीर किंवा दीर्घ आजारांमध्ये वापरले जातात.