Mango : जगातील सर्वात महागडा आंबा, 1 किलोच्या भावात मिळेल 4 तोळे सोने

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Mango : उन्हाळा ऋतू नुकताच सुरू झाला आहे. आता बाजारात हंगामी फळे देखील आली असून यामध्ये आंब्याची मागणी वाढू लागली आहे. आंब्याला फळांचा राजा असेही म्हटले जाते. भारतात त्याचे अनेक प्रकार पहायला मिळतात. त्यामध्ये लंगडा, बदाम, दसरी, चौसा, अल्फोन्सो, तोतापरी, केसर, हापूस आणि इतर जातींचा समावेश आहे. तर या भारतीय आंब्यांना परदेशातही मोठी मागणी असून तिथे ते वाढीव भावाने विकले जातात.

Not so aam! What you need to know about Miyazaki, the world's costliest  mango

तर आज आपण एका अशा आंब्याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत जो तब्ब्ल 2.5 लाख रुपये किलोपर्यंत विकला जातो. होय… हे अगदी खरे आहे. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की, या 1 किलो आंब्याची किंमत 2.50 लाख रुपये आहे. तर मग हा आंबा आहे कोणत्या प्रकारचा ? हा आंबा जपानमध्ये सर्वसाधारण लिलावात 2.5 लाख रुपये प्रति किलोपर्यंत विकला जातो. तर मध्य प्रदेशात तोच आंबा 20 हजार रुपये किलोपर्यंत विकला जातो. 1 किलोमध्ये साधारणतः 5 आंबे बसतात. भावानुसार एका आंब्याची किंमत सुमारे 4,000 रुपये इतकी होते. Mango

Mango | Miyazaki Local Products and Trade Promotion Center

हा आंबा कुठे पिकतो ???

हा जपानी जातीचा आंबा असून त्याचे नाव ‘मियाझाकी’ असे आहे. याला जगातील सर्वात महागडा आंबा देखील म्हटले जाते. जपानमधील मियाझाकी शहरात याची लागवड केली जाते. त्यांच्या चमकदार रंगामुळे आणि अंड्याच्या आकारामुळे या आंब्यांना “सूर्याची अंडी” असेही म्हटले जाते. ते साधारणपणे एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान वाढतात. तसेच पिकल्यानंतर या आंब्याचा रंग जांभळा ते लाल होतो. Mango

आता भारतीय शेतकरीही करत आहेत या आंब्याची लागवड

हे जाणून घ्या कि, भारतातील कोटा येथील श्रीकिशन सुमन या शेतकऱ्याने मियाझाकी आंब्याचे रोप वाळवंटात लावले आहे. गेल्या 5 वर्षांपासून ते मियाझाकी आंब्याच्या जातीवर काम करत आहेत. श्रीकिशनने आतापर्यंत याच्या 50 रोपांची विक्री केली असून त्याच्याकडे आणखी 100 रोपांची ऑर्डर देखील मिळाली आहे. Mango

World's most expensive mango Miyazaki in Bangladesh | The Daily Star

मध्य प्रदेशातील जबलपूरमध्येही एका शेतकऱ्याने ‘मियाझाकी’ आंब्याची लागवड केली आहे. गेल्या वर्षी आपल्या 2 झाडांच्या संरक्षणासाठी त्याने चक्क 3 सुरक्षा रक्षक आणि 6 कुत्रे ठेवले होते. आरपीजी एंटरप्रायझेसचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी सोशल मीडियावरील युझर्सना ट्विटद्वारे याची माहिती दिली होती. Mango

Miyazaki: This mango variety being grown in MP could cost you Rs 2.7 lakh  per kilogram - India Today

‘मियाझाकी’ आंब्याचे वैशिष्टय

‘मियाझाकी’ या आंब्याचे सरासरी वजन सुमारे 350 ग्रॅम असते. तसेच यामध्ये साखरेचे प्रमाणहा सामान्य जातीच्या आंब्यांपेक्षा 15% जास्त असते. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, बीटा-कॅरोटीन आणि फॉलिक एसिड भरपूर प्रमाणात आढळतात. जांभळ्या रंगाचा हा आंबा आता बांगलादेश, भारत, थायलंड आणि फिलिपाइन्समध्येही पिकवला जातो आहे. साधारणपणे एका मियाझाकी आंब्याची किंमत 3500 रुपये असते, मात्र 2021 मध्ये जपानमध्ये 2.7 लाख रुपयांमध्ये याच्या 2 आंब्याचा लिलाव झाला होता.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.miyazaki-city.tourism.or.jp/en/special/Rich_Miyazaki_Mangoes

हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे नवीन भाव पहा
Investment Tips : डेट म्युच्युअल फंड की एफडी यांपैकी जास्त रिटर्न कुठे मिळेल ? तज्ज्ञांकडून समजून घ्या
BSNL च्या ‘या’ प्लॅनद्वारे वर्षभर रिचार्जपासून सुट्टी, डेली 2GB डेटा सोबत मिळवा आणखी फायदे
New Business Idea : कोणत्याही खर्चाशिवाय ‘हा’ व्यवसाय सुरू करून दरमहा हजारो रुपये कमावण्याची संधी
Samsung Galaxy F14 5G : अगदी कमी किंमतींत खरेदी करा Samsung चा नवा फोन, पहा फीचर्स अन् किंमत