…तर भाजप फक्त 50 जागांवर येईल; नितीशकुमारांचा मोठा दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 2024 लोकसभा निवडणुकीत देशभरातील सर्व विरोधक एकत्रितपणे लढल्यास भाजप फक्त 50 जागांवर येईल असा मोठा दावा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केला आहे. पाटणा येथील पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत संबोधित करताना त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. या बैठकीत बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या स्थितीवर आवाज कसा उठवायचा यावर चर्चा करण्यात आली आणि रणनीती ठरविण्यात आली.

नितीशकुमार म्हणाले की, भाजप देशाचे वातावरण बिघडवत आहे. राज्यातील जातीय व सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम भाजपचे लोकच करतील, पंचायत स्तरापर्यंत आपण सर्वांनी पूर्ण काळजी घ्यावी. मी देशभरातील विरोधी पक्षांना एकत्र करण्यात गुंतलो आहे कारण हे सर्वात महत्वाचे आहे. सर्व पक्ष एकत्र येऊन नेत्याची निवड केली जाईल. 2024 च्या निवडणुकीसाठी सज्ज रहा अस स्पष्ट आवाहन नितीशकुमार यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना केले.

2020 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या कारस्थानामुळे आमच्या जागा कमी झाल्या, असेही नितीश म्हणाले. मला स्वत: मुख्यमंत्री व्हायचे नव्हते, पण भाजपच्या विनंतीवर मी होकार दिला. याचे कारण बिहारच्या विकासाला सुरुवातीपासूनच माझे प्राधान्य राहिले आहे.