हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणावरूण राज्यातील महाविकास आघाडी वर भाजपमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. आरक्षणाचा प्रश्न लवकर मार्गी लावला नाही तर मराठा समाजाला एकत्रित घेऊन मोर्चा काढण्याचा इशारा शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिला आहे. मात्र, याबाबत राज्य सरकारकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने आता पेटून उठलेल्या मेटेंनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अशोक चव्हाण यांच्या विरोधात न्यालयात याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत विनायक मेटेंनी आज माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी मेटेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्याकडे महत्वाची मागणी केली. ती म्हणजे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एक पर्याय शोधला आहे. तो म्हणजे ईड्ब्लुएस आरक्षण लागू करण्यात यावे. यातून मराठा समाजाला आरक्षण अशा रीतीने देता येईल, असे मेटे यांनी म्हंटल आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला देण्यात येणारे आरक्षण हे एक महिना होत आला रद्द केले आहे. याबाबत राज्य सरकारकडूनही काहीच हालचाली केल्या जात नसल्याचे दिसते.
महाविकास आघाडी सरकार खोटं बोलत आहे. या सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक केली जात आहे. SEBC मधील विध्यार्थ्यांना लवकरात लवकर नियुक्ती देण्यात या, अशी आम्ही मागणी केली होती. तेव्हा त्या विध्यार्थ्यांना हे सरकार न्यायालयात जावा, असे म्हणाले. आता न्यायालयानेच आरक्षणाचा निर्णय रद्द केला. जर याबाबत लवकर निर्णय घेतला नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अशोक चव्हाण यांच्या विरोधात औरंगाबाद न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत, असा इशारा मेटे यांनी दिला आहे.