…तर शिवरायांच्या पुतळ्याचा भव्यदिव्य लोकार्पण सोहळा आम्ही करु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – गेल्या नऊ वर्षांपासून शिवप्रेमींनी पाठपुरावा, आंदोलने केल्यानंतर अखेर क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा विराजमान झाला असून, कारागिरांकडून सजावटीचे काम अंतिम टप्प्यात आहे.

आगामी १९ फेब्रुवारीला शिवजयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्याचे नियोजन जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीने केले आहे. त्यानुसार १८ फेब्रुवारीला सायंकाळी किंवा जयंती दिनी सकाळी शिवरायांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा महापालिका प्रशासनाने करावा. चालढकल केली तर आम्हीच लोकार्पण करू, असे उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेतून बजावले.

शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला किंवा जयंतीदिनीच क्रांती चौकातील पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पालिकेने आयोजित करावा. कोणाला बोलवायचे हा मनपा प्रशासनाचा अधिकार आहे. मुख्यमंत्री किंवा शिवरायांचे वंशज आले तर आनंदच आहे. मात्र, कोणाला खूश करण्यासाठी घोळ घालून चालढकल अजिबात चालणार नाही, असा इशारा विनोद पाटील यांनी दिला आहे. यासंदर्भात ते मनपा प्रशासकांना लवकरच भेटणार आहेत.

Leave a Comment