हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन देण्यात येत आहे. यापूर्वी माध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांना फक्त खिचडी देण्यात येत होती. मात्र इथून पुढे माध्यान्ह भोजनात भगर, थालीपीठ, इडली-सांबार आणि पराठाही देण्यात येणार आहे. राज्य सरकारने नेमलेल्या समितीकडून हा निर्णय घेण्यात आला असून याचे स्वागत शिक्षणमंत्री दीपक केसरकर केले आहे. त्यामुळे इथून पुढे विद्यार्थ्यांना पौष्टिक आहारामध्ये इतर सर्व पदार्थ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
प्रधानमंत्री माध्यान्ह भोजनात फक्त खिचडीत उपलब्ध होत असल्यामुळे अनेकांकडून याबाबत तक्रार करण्यात आली होती. यानंतर विद्यार्थ्यांना योग्य, पौष्टिक, आरोग्यदायी आहार मिळावा यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकार साठी काही सूचना जारी केल्या होत्या. यामध्ये, स्थानिक उपलब्ध होणारे अन्नपदार्थ व तृणधान्य यांचा समावेश या आहारात करावा. असा आवर्जून उल्लेख करण्यात आला होता. यानंतर राज्य सरकारने एक शालेय शिक्षण विभागाकडून समिती नेमली होती. या समितीकडून विद्यार्थ्यांच्या आहाराविषयी सर्व लेखाजोखा काढण्यात आला होता.
तसेच विद्यार्थ्यांसाठी पोषक आहार कसा देण्यात येईल याचाही आराखडा तयार करण्यात आला होता. याबाबत संपूर्ण तपासणी केल्यानंतर समितीने माध्यान्ह भोजनात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता इथून पुढे समितीने नेमलेला आहार विद्यार्थ्यांच्या घोषणा देण्यात येणार आहे. यामध्ये भगर, थालीपीठ, खिचडी, इडली – सांबार आणि पराठा अशा गोष्टींचा समावेश असेल. समितीने शिक्षणमंत्र्यांकडे केलेल्या शिफारशी मध्ये इतर गोष्टी देखील नमूद करण्यात आल्या आहेत.
त्यानुसार, माध्यान्ह भोजनात सोयाबीन तेलाऐवजी सूर्यफुल तेलाचा वापर करावा. आठवडाभरात एकच आहार देण्याऐवजी दर दोन दिवसांनी विद्यार्थ्यांच्या आहारात बदल करण्यात यावा. उडीद-तांदळाची इडली, रवा इडली, केशरी रवा इडली असे पौष्टिक पदार्थ विद्यार्थ्यांच्या आहारात देण्यात यावेत. मल्टिग्रेन पराठ्यामध्ये चार प्रकारचे धान्य असावे सोबत पुदिना चटणी द्यावी. मुख्य म्हणजे, माध्यान्ह भोजन तयार करणाऱ्या व्यक्ती, संस्थांच्या मानधनात वाढ करावी अशी शिफारस समितीने केली आहे. या सर्व नमूद केलेल्या मुद्द्यांना शिक्षण मंत्र्यांकडून परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान, माध्यान्ह भोजनात बदल केल्यानंतर विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळेल. तसेच त्यांच्या आरोग्यात देखील सुधारणा होईल. यासाठी सरकारकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून माध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांना फक्त खिचडी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थी देखील खिचडीला कंटाळ्याचे दिसत आहे. अशा अनेक कारणांमुळे माध्यान्ह भोजनात बदल करण्यात आला आहे.