हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी 2024 साली कोणता पक्ष सत्तेवर असेल याबाबत सध्या चर्चा, दावेही केले जाऊ लागले आहेत. तर विरोधी पक्षांकडून भाजपला मात देण्यासाठीही प्रयत्न सुरु झाले आहे. या पार्शवभूमीवर आज संसदेच्या अधिवेशनात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एक महत्वाचा दावा केला तो म्हणजे “2024 मध्ये पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार निवडून येईल. विरोधी पक्षात एक नेता कुणी नाही. त्यामुळे मोदींसमोर कोणतेही मोठे आव्हान नाही, असे आठवले यांनी म्हंटले.
सध्या संसदेचे अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनात विरोधी पक्षांकडून गोंधळ घातला गेल्याने त्यांच्यावर मंत्री आठवले यांनी सडकून टीका केली. तर आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा असतील असेल दावाही केला.
यावेळी निवडणुकीबाबत व विरोधकांबाबत मंत्री आठवले म्हणाले की, आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे सरकारच निवडून येणार आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात किती राजकीय पक्ष एकत्र येतील हा प्रश्नच आहे. मात्र, सध्या तरी आमच्या विरोधी पक्षात एक नेता कुणी नाही. त्यामुळे मोदींसमोर कोणतेही मोठे आव्हान नाही,” असे आठवले यांनी सांगितलं.