निवडणुका नसल्यामुळे त्यावर फार चर्चा करण्यामध्ये अर्थ नाही; अजित पवार

औरंगाबाद; आज अजित पवार बीड आणि उस्मानाबादच्या दौऱ्यावर औरंगाबाद येथील विमानतळावरुन जाताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बोलताना बऱ्याच विषयांबाबत चर्चा केली. मराठा आरक्षणाची बैठक समाधान कारक झाली असून, पुढच्या आठवड्यात मराठा आरक्षणासाठी बैठक घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर आघाडी सरकार व्यवस्थित काम करत आहे. आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत. सध्या कुठल्याही निवडणुका नसल्यामुळे त्यावर फार चर्चा करण्यामध्ये अर्थ नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

‘कोणी काहीही बोलतं, कुठलाही पक्ष स्वतःला गुंड म्हणून घेणार नाही. आज राज्याचे प्रमुख शिवसेनेचे नेते आहेत.’ सगळ्याना सोबत घेऊन काम करा,’ शिवसेना ही की सर्टिफिईड गुंडा असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले होते यावर बोलताना अजित पवार यांनी त्यांचे मत मांडले.

‘राज्यात कोणी कोणा बरोबर चर्चा करत असाल तरी सरकार व्यवस्थित चालू आहे. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवाण्याचा अधिकार असून हे लोकशाहीचे लक्षण आहे. सध्या कोरोनाचे सावट असून सध्या कुठल्याही निवडणूका नसल्यामुळे यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही. पाऊस पडतोय शेतकऱ्यांना खत, बियाणे कसे मिळतील यावर सरकरचे लक्ष आहे’ असंही त्यांनी सांगितलं.

You might also like