राऊतांची थेट तक्रार अन् कोर्टाने ईडीला झापलं; नेमकं काय झालं??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर आज कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान संजय राऊत यांनी कोर्टाकडे ईडीची तक्रार केली. मला ज्या खोलीत ईडीने ठेवलंय तिथे व्हेंटिलेशन व्यवस्थित नाही, अशी तक्रार संजय राऊत यांनी केली. त्यानंतर कोर्टाने ईडीला झापल्या नंतर ईडीने माफी मागितली.

नेमकं काय झालं ?

संजय राऊत यांना कोर्टात आणताच तुम्हाला ईडी कोठडीत काही त्रास झाला का? असा प्रश्न कोर्टाने राऊतांना विचारला. त्यावर बोलताना मला ज्या ठिकाणी ठेवलं तिथे कसलंही व्हेंटिलेशन नाही. तसेच तिथे चांगली व्यवस्था नाही, अशी तक्रार संजय राऊत यांनी केली. त्यानंतर कोर्टाने ईडीला फटकारले. ही बाब गंभीर असल्याचे कोर्टाने निदर्शनास आणून दिले. तसेच तुम्ही यावर काय पाऊलं उचणार असा सवाल कोर्टाने ईडीला केला. राऊतांना त्रास होणार नाही असं तुम्ही लेखी दिलं होतं, त्याचं काय झालं, असा प्रश्न कोर्टाने ईडीला विचारलं. त्यावर माफी मागत आम्ही राऊतांना व्हेंटिलेशन असलेली रूम देण्यास तयार असल्याचे ईडीने सांगितले.

दरम्यान, कोर्टाने संजय राऊत याना ८ ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडीची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडी वकिलांनी राऊतांवर आज पुन्हा एकदा कोर्टात गंभीर आरोप केले. प्रवीण राऊत यांच्याकडून जे पैसे मिळाले त्यातुन संजय राऊत यांनी अलिबाग येथील जमीन खरेदी केली असा दावा ईडीने कोर्टात केला आहे. तसेच संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत याना अनोळखी व्यक्तीने १ कोटी १७ लाख रुपये पाठवले आहेत. असेच अजून मोठे व्यवहार झाले आहेत का याचा तपस आम्ही करत असं ईडीच्या वकिलांनी कोर्टात सांगितले. यासाठी संजय राऊत यांची कोठडी १० ऑगस्ट पर्यंत द्यावी अशी मागणी त्यांनी कोर्टात केली होती.

तर दुसरीकडे संजय राऊत यांच्यावर नवीन आरोप नाहीत तर मग त्यांची पुन्हा चौकशी का ? असा सवाल राऊतांचे वकील मनोज मोहिते यांनी केला. राऊतांविरोधात फक्त राजकीय षडयंत्र आहे असा आरोपही त्यांनी केला. अखेर दोन्ही बाजूनी सुनावली पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने संजय राऊतांना ८ ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.