Monday, January 30, 2023

गजब कारभार चक्क आमदाराच्या कर्मचाऱ्यालाच केले मृत घोषित

- Advertisement -

जुन्नर : हॅलो महाराष्ट्र – सध्या महाराष्ट्रात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. यामध्ये पुणेमध्ये रुग्णांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आता तर राज्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कि रुग्णांना बेड मिळत नाही आहेत. तसेच रुग्णालयाकडून देण्यात येणाऱ्या मृतांच्या आकड्यामध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात घोळ होत आहेत. असाच एक प्रकार जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या बाबतीत घडला आहे.

रुग्णालयाने चक्क आमदार अतुल बेनके यांच्या सोशल मीडिया प्रमुखालाच कोविड यादीमध्ये चक्क मृत दाखवले आहे.कोरोनाच्या काळात अनेक आमदार खासदारांनी आपल्या तालुक्यातील जनतेला वाऱ्यावर सोडले याची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली होती. त्यातच आता चक्क स्वताच्याच कार्यकर्त्याला मृत दाखवल्याने आमदार अतुल बेनके यांच्यावर विरोधकांनी टीका केली आहे. याचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पडसाद उमटले आहेत.

- Advertisement -

काय आहे नेमकं प्रकरण
आळेफाटा येथील विजय भिका कुऱ्हाडे हे विद्यमान आमदार अतुल बेनके यांचे सोशल मीडिया प्रमुख आहेत. नुकतेच त्यांनी कोविड वर उपचार करून ते बरे झाले होते. याचदरम्यान रुग्णालयात विजय बबन कुऱ्हाडे यांचे कोविडमुळे निधन झाले. मात्र प्रशासनाकडून विजय भिका कुऱ्हाडे यांना मृत घोषित करण्यात आले. विजय भिका कुऱ्हाडे यांना मृत घोषित दाखवून त्यांच्या नावापुढे त्यांचा मोबाईल सुद्धा टाकण्यात आला. विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरून सोशल मीडियात “का ओ शेठ?” असा मेसेज फॉरवर्ड करत आमदार अतुल बेनके यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यामुळे स्थानिक पातळीवरचे राजकारण पेटले आहे.