हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | म्यानमारच्या लष्कराने उठाव करून सत्ता आपल्या ताब्यात घेतली आहे. लष्कराने म्यानमारच्या अनेक मोठ्या नेत्यांना ताब्यात घेतले आहे. काहींना त्यांच्या शासकीय निवासस्थानामध्ये नजरकैद करून ठेवले आहे. हे एक नियोजित बंड असल्याचे अनेक देश बोलत आहेत. दरम्यान, म्यानमारचे लष्करप्रमुख या विषयावर बोलते झाले आहेत. त्यांनी लष्करी उठाव करण्यामागील कारण सांगितले आहे.
म्यानमार खूप अवघड अवस्थेतून जात असून लष्कराला उठाव करण्याशिवाय कोणताही मार्ग नव्हता. देशासाठी हाच एकमेव पर्याय होता. म्हणून आम्ही हाच एकमेव पर्याय निवडला. असे म्यानमारचे लष्करप्रमुख जनरल मिन ओंग हेलेइंग यांनी म्हटले आहे. म्यानमार लष्कराच्या अधिकृत वेबपेजवरती ही माहिती देण्यात आली आहे.
लोकप्रिय नेत्या आंग सान सूची यांच्या नॅशनल लीग फोर डेमॉक्रॅसी या पक्षाने 8 नोव्हेबर रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बहुमत मिळवले होते. पण या निवडणुकीमध्ये गैरप्रकार झाला आहे असे म्यानमारचे लष्कर म्हणत असून ते निकाल स्वीकारण्यासाठी तयार होत नाही. लष्कराने सूची यांना ताब्यात घेतले असून त्यांना कोणत्या ठिकाणी बंदी बनवून ठेवले आहे हे अजून समजले नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.