युझर्सना मूर्ख बनवून सहजपणे फोन हॅक करत आहेत ‘हे’ Apps, त्याविषयी जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । संशोधकांनी एक नवीन अँड्रॉइड ट्रोजन फ्लायट्रॅप शोधला आहे. हा व्हायरस 140 पेक्षा जास्त देशांतील फेसबुक युझर्सची खाती हॅक करत आहे. Zimperium zLabs मोबाईल थ्रेट रिसर्च टीमच्या मते, मार्च 2021 पासून Google Play Store च्या मॅलिशियस अ‍ॅप्स, थर्ड-पार्टी अ‍ॅप स्टोअर्स आणि साइडलोड अ‍ॅप्सद्वारे मालवेअर पसरला आहे. हे मालवेअर अगदी सिंपल ट्रिकवर काम करते. हे सर्वांत पहिले पीडिताला त्यांच्या फेसबुक क्रेडेन्शियलचा वापर करून मॅलिशियस अ‍ॅपमध्ये लॉग इन करण्यास प्रवृत्त करते, त्यानंतर ते युझर्सचा डेटा चोरते.

संशोधकांच्या मते, फ्लायट्रॅप नेटफ्लिक्स कूपन कोड, गुगल अ‍ॅडवर्ल्ड कूपन कोड आणि बेस्ट फुटबॉल टीम वोटिंग आणि खेळाडू अशा विविध प्रकारच्या मोबाईल अ‍ॅप्सचा वापर करते. हे अ‍ॅप्स डाऊनलोड केल्यानंतर युझर्सना मूर्ख बनवते आणि अनेक प्रकारचे प्रश्न विचारते.

या सर्वांची उत्तरे दिल्यानंतर, ते युझर्सना फेसबुक लॉगिन पेजकडे डायरेक्ट करते, ज्यासाठी ते वोटिंग करण्यासाठी फेसबुक खात्यासह लॉगिन करण्यास सांगते.
युझर्सच्या फेसबुक आयडी, लोकेशन, ईमेल ऍड्रेस आणि आयपी ऍड्रेसमध्ये एक्सेस मिळवण्यासाठी मालवेअर जावास्क्रिप्ट इंजेक्शन वापरते. नंतर चोरलेली माहिती फ्लायट्रॅपच्या कमांड आणि कंट्रोल सर्व्हरवर ट्रान्सफर केली जाते.

Ziperium ने गुगल प्ले स्टोअरद्वारे फ्लायट्रॅप मालवेअर ट्रान्सफर करणाऱ्या तीन धोकादायक अ‍ॅप्स बद्दल गुगलला इशारा दिला आहे. त्यानंतर गुगलने मॅलिशियस अ‍ॅप्सचे रिसर्च आणि वेरिफाय केले आणि त्यांना गुगल प्ले स्टोअरमधून काढून टाकले.

असावं कोणते अ‍ॅप्स आहेत ते जाणून घ्या …

>>GG Voucher (com.luxcarad.cardid)
>>Vote European Football (com.gardenguides.plantingfree)
>>GG Coupon Ads (com.free_coupon.gg_free_coupon)
>>GG Voucher Ads (com.m_application.app_moi_6)
>>GG Voucher (com.free.voucher)
>>Chatfuel (com.ynsuper.chatfuel)
>>Net Coupon (com.free_coupon.net_coupon)
>>Net Coupon (com.movie.net_coupon)
>>EURO 2021 Official (com.euro2021)

Leave a Comment