नवी दिल्ली । ज्यांचे बँकेत खाते आहे त्यांच्यासाठी ही मोठी बातमी आहे. जर तुमच्याकडेही SBI च्या स्टेट बँकेसह अनेक खाजगी आणि सरकारी बँकांमध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. बँकेने लाखो करंट अकाउंट बंद केली आहेत, ज्यामुळे लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. असे मानले जाते आहे की, केवळ स्टेट बँकेने सुमारे 60,000 ग्राहकांची खाती बंद केली आहेत. बँकेने ही खाती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank of India) निर्देशानुसार बंद केली गेली आहेत.
इकॉनॉमिक टाइम्स या इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, करंट अकाउंट बंद केल्यामुळे अनेक छोट्या व्यावसायिकांना अडचणी येत आहेत. जर ग्राहकाने इतर कोणत्याही बँकेकडून कर्ज घेतले असेल तर बँक या ग्राहकांचे करंट अकाउंट उघडू शकणार नाही. RBI च्या या नियमाबद्दल जाणून घ्या-
खाती का बंद झाली ?
RBI च्या या नियमाचा उद्देश कॅश फ्लोवर लक्ष ठेवणे आणि फंडचा गैरवापर तपासणे हा आहे. RBI ने म्हटले आहे की,”या नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार, अनेक कर्जदार अनेक बँकांमध्ये करंट अकाउंट उघडून फंडचा गैरवापर करत होते, यामुळे बँकेने या सर्व ग्राहकांची खाती बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
बँक अधिकाऱ्याने माहिती दिली
RBI च्या नवीन नियमांमुळे ग्राहकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सरकारी बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ET ला सांगितले की,” हजारो खाती बंद करण्यास भाग पाडण्यात आले आहे. जर आपण सर्व बँकांबद्दल बोललो तर ही संख्या लाखांमध्ये असू शकते.”
बँकेने मेल पाठवून ग्राहकांना माहिती दिली
बँकेने ग्राहकांना ईमेल आणि मेसेज पाठवून याबाबत माहिती दिली आहे. SBI ने आपल्या ग्राहकांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की,’RBI ने जारी केलेल्या निर्देशानुसार तुमचे करंट अकाउंट बंद केले जात आहे. तुम्ही आमच्या शाखेत कॅश, क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्ट सुविधा घेऊ शकता. तुम्हाला विनंती आहे की, तुमचे करंट अकाउंट 30 दिवसांच्या आत बंद करण्याची व्यवस्था करा.’
SBI ने 60,000 पेक्षा जास्त खाती बंद केली
स्टेट बँकेने 60,000 हून अधिक खाती बंद केली आहेत. गेल्या वर्षी केलेल्या नियमानुसार, कर्जदाराचे करंट अकाउंट फक्त त्या बँकेत असू शकते ज्यात त्याच्या एकूण कर्जांच्या किमान 10 टक्के रक्कम असेल.