SBI च्या ‘या’ सेवा उद्या 2 तास बंद राहणार, याकाळात बँक ग्राहक कोणताही व्यवहार करू शकणार नाहीत!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्वाची आहे. देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक बँक असलेल्या SBI च्या काही सेवा उद्या म्हणजेच बुधवारी (15 सप्टेंबर) 2 तास बंद राहतील. या काळात SBI ग्राहक कोणतेही व्यवहार करू शकणार नाहीत. भारतीय स्टेट बँकेने ट्विटरवर अलर्ट जारी करून ही माहिती दिली आहे.

खरं तर, SBI ने ट्विटरवर म्हटले आहे की,”सिस्टीम मेन्टनन्समुळे 15 सप्टेंबरला बँकेच्या काही सेवा बंद राहतील. या सेवांमध्ये इंटरनेट बँकिंग,Yono, Yono Lite आणि UPI सर्व्हिस समाविष्ट असतील.” SBI ने एका ट्विटद्वारे म्हटले आहे की,”15 सप्टेंबरच्या रात्री 12 ते 2 (120 मिनिटे) या सेवा उपलब्ध होणार नाहीत.”

बँकेने म्हटले आहे की,” या काळात ग्राहकांनी कोणत्याही प्लॅटफॉर्मवर व्यवहारांसह इतर एक्टिविटी टाळण्याचा प्रयत्न करावा.”

यापूर्वी 04 सप्टेंबर रोजी मेन्टनन्समुळे SBI ची Yono सर्व्हिस सुमारे 3 तास बंद होती. याशिवाय जुलै आणि ऑगस्ट महिन्यात देखील मेन्टनन्समुळे SBI ने बँकिंग सेवा बंद केली होती. सहसा मेन्टनन्सचे काम रात्री केले जाते, त्यामुळे जास्त ग्राहक प्रभावित होत नाहीत.

SBI ची इंटरनेट बँकिंग सेवा 8 कोटींहून अधिक लोकं वापरतात आणि मोबाईल बँकिंगचा वापर सुमारे 2 कोटी लोकं करतात. त्याच वेळी, योनोवर रजिस्टर्ड ग्राहकांची संख्या 3.45 कोटी आहे, ज्यावर दररोज सुमारे 90 लाख ग्राहक लॉगिन करतात.

Leave a Comment