अकोला प्रतिनिधी | राष्ट्रीय सवयंसेवक संघासंबंधी काँग्रेसकडून आघाडीच्या लेखी पात्राला प्रकाश आंबेडकरांनी पत्राद्वारेच उत्तर दिले आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला पात्र लिहिले आहे. या पात्रात त्यांनी काँग्रेसवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
काँग्रेसने आंबेडकरांना आघाडीत सामील होण्याचा लेखी प्रस्ताव दिला होता. याला आंबेडकरांकडून काँग्रेसला चार पानी पत्राद्वारे उत्तर देण्यात आले आहे. काँग्रेसच्या आघाडीच्या हेतूवर आंबेडकरांनी पत्राद्वारे संशय व्यक्त केला आहे. तसेच काँग्रेस आपली भूमिका सतत बदलत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काँग्रेस सॉफ्ट हिंदुत्वाचा पुरस्कार करीत आहे,असा आरोप या पात्रात केला आहे. तसेच काँग्रेस आमच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे ते म्हणाले.
जुलै पासून आघाडी संदर्भात काँग्रेसशी पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी म्हणले आहे.मात्र आमची भूमिका जागांसंदर्भात नसून तात्विक मुद्यांवर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीचे आणण्याच्या मुद्द्यावर घटक पक्षातील विधीतज्ञ् नेत्यांची समिती नेमण्यासाठीची मागणी आंबेडकर यांनी केली आहे. यावर काँग्रेस काय उत्तर देते याची वाट पाहत असल्याचे ते म्हणाले.
इतर महत्वाचे –
जॉन अब्राहमचा ‘रोमिओ, अकबर, वॉल्टर (रॉ)’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
सलाम ! महिलेनं स्वतः कर्ज काढून उभारलं भव्य वृद्धाश्रम
सांगलीत पोलिसांचं ऑल आऊट ऑपरेशन