शिवसेनेला हे दिवस कोकणामुळे बघायला मिळालेत हे त्यांनी विसरू नये; प्रवीण दरेकर यांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात तडाखा बसल्यामुळे तीन दिवस विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व देवेंद्र फडणवीस यांनी दौरा केल्यानंतर आज मुख्यमंत्री ठाकरेंनी या भागाचा दौरा केला. या दौऱ्यानंतर प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका केली आहे. दौरा करायचा आणि नुकसानीची घोषणा करायची नाही. शिवसेनेला हे वैभवाचे, सत्तेचे दिवस आले आहेत. याला कोकणाचाही महत्वाचा, सिहांचा वाटा आहे. कोकणमुक्तेचेशिवसेनेला हे दिवस बघायला मिळालेत, हे मुख्यमंत्र्यानी विसरू नये,” अशा शब्दात दरेकरांनी टीका केली आहे.

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व भाजपच्यावतीने आज मुंबईत पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी प्रवीण दरेकरांनी भाजपच्यावतीने केलेल्या तीन दिवसांच्या दौऱ्याची माहिती दिली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचाही समाचार घेतला. यावेळी दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुख्यमंत्री ठाकरेंना कोकण व रत्नागिरीचा दौरा करायचा होता तर त्यांनी वेळ द्यायला पाहिजे होती. मात्र, तीन तासांच्या या दौऱ्यात त्यांनी काय केलं? त्यांना बैठक घ्यायची होती तर मग वर्षा बंगल्यावरच घ्यायला हवी होती. इकडे कशाला यायचं? सर्व अधिकाऱ्यांना तिकडेच बोलवून घ्यायचे ना? असा सवालही यावेळी दरेकर यांनी विचारला.

कोकणचा माणूस हा चिंताग्रस्त आहे. त्याची दुःखे समजू घ्यायची गरज आहे. मात्र, सत्ताधारी निव्व्ल दिखावा करण्याचं काम करीत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन ते तीन तासांच्या दौऱ्यात काय केलं? त्यांना काय माहिती मिळणार? त्यांनी लोकांशी संवाद सदन गरजेचं होत. मी हवाई प्रवास करीत नाहीत, असे म्हुख्यमंत्री ठाकरे म्हणतात. मग त्यांनी हि दोन ते तीन तासांची भेट, दौरा हवाई पद्धतीनेच केला आहे हे विसरू नये, असा टोलाही दरेकर यांनी यावेळी लगावला.

मुख्यमंत्र्यांचा हा खऱ्या अर्थाने ‘वादळी’ दौरा!

प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्विटवरून टोला लगावला आहे. दरेकर यांनी ट्विटमधून म्हंटल आहे कि, मुख्यमंत्र्यांचा हा खऱ्या अर्थाने ‘वादळी’ दौरा! “वादळ येण्यापूर्वी जसे ३ दिवस प्रशासन कामाला लागते तसेच आताही झाले. या ‘वादळा’ने फक्त ३ तासात धूळधाण केली. या ‘वादळा’मुळे कोकणात इतकी पानं पडली की आता लोकांच्या तोंडाला पुसायला पण पानं शिल्लक राहिली नाहीत.आपल्या व्यस्त कार्यक्रमातून घराबाहेर पडून, कोकणातील ३ जिल्ह्यांना मिळून तब्बल ३ तास दिल्याबद्दल मुख्यमंत्र्याचे आभार, असे म्हणत दरेकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना टोला लगावला आहे.

Leave a Comment