पाटणा : वृत्तसंस्था – चोरीच्या अनेक घटनांचे व्हिडिओ आपण पाहिले असतील. सध्या भागलपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये जमलापूर साहेबजंग पॅसेंजर ट्रेनच्या खिडकीतून मोबाईल चोरी (thief) करताना एका चोराला प्रवाशांनी पकडले तब्बल तीन किलोमीटर पर्यंत हा चोर (thief) बाहेर लटकत होता साधारणपणे यावेळी ट्रेनची गती 80 किलोमीटर इतकी होती. ही घटना घोगा रेल्वे स्टेशनदरम्यान घडली.
https://twitter.com/RajaramUbhe/status/1575682043182129153
व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो एक व्यक्ती ट्रेनच्या खिडकीला लटकलेल्या अवस्थेत आहे. आणि तो प्रवाशांकडे मदतीची मागणी करत आहे. ही घटना घोगा रेल्वे स्टेशन दरम्यान घडली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. घोगा रेल्वे स्टेशन दरम्यान चोरांची एक टोळी मोबाईल घेऊन पळ काढत होती. इतक्यात ट्रेन सुरू झाल्याने चोरांना (thief) पळ काढण्यात यश मिळाले. मात्र त्यातील एका चोराला प्रवाशांनी खिडकीतून पकडून धरले. तब्बल तीन किलोमीटर पर्यंत हा चोर बाहेर लटकत होता आणि ट्रेनची गती ही 80 km इतकी होती.
प्रवाशांनी त्याला आत ओढण्याचा प्रयत्न केला. ट्रेनची गतीही वाढत होती, प्रवासी एकीकडे चोर चोर (thief) म्हणून ओरडत होते. तर दुसरीकडे चोर हा प्रवाशांकडे हात न सोडण्याची विनंती करत होता. अखेर प्रवाशांनी त्याला ट्रेनमध्ये ओढले. ट्रेनमध्ये येताच प्रवाशांनी त्याची धुलाई केली. काही प्रवाशांनी तर त्याला बेल्ट काढून मारहाण केली आहे.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय