हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD चे व्याजदर वाढवण्याची स्पर्धा सुरूच आहे. अनेक बँका आपल्या FD चे दर वाढवत आहेत. आता बँक आपल्या FD वर आधी पेक्षा जास्त व्याज दर देत आहेत. खाजगी क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी बँक असलेली ICICI बँक देखील आपल्या FD व्याजदरात सातत्याने वाढ करत आहे. आज पुन्हा एकदा बँकेने आपल्या FD च्या व्याजदरात वाढ केल्याची घोषणा केली आहे. FD Rates
ICICI Bank ने आपल्या 2 कोटी ते 5 कोटीच्या विविध कालावधीच्या FD दरात 10 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. हे दर 28 एप्रिल, 2022 पासून लागू करण्यात आले आहेत.
05 बेसिस पॉइंट्सने वाढ झालेल्या FD
कालावधी आधीचे दर नवीन दर
1 वर्ष ते 389 दिवस 4.3 टक्के 4.35 टक्के
390 दिवस ते 15 महीने 4.3 टक्के 4.35 टक्के
15 महीने ते 18 महीने 4.4 टक्के 4.45 टक्के
10 बेसिस पॉइंट्सने वाढ झालेल्या FD
कालावधी आधीचे दर नवीन दर
18 महीने ते 2 वर्ष 4.5 टक्के 4.6 टक्के
2 वर्ष 1 दिवस ते 3 वर्ष 4.6 टक्के 4.7 टक्के
3 वर्ष 1 दिवस ते 5 वर्ष 4.6 टक्के 4.7 टक्के
5 वर्ष 1 दिवस ते 10 वर्ष 4.7 टक्के 4.8 टक्के
या वर्षी जानेवारीपासून बँकेने अनेक वेळा व्याजदरात वाढ केली आहे. मात्र सर्वसामान्य आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर एकसारखेच ठेवण्यात आले आहेत.