सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
साताऱ्यातील माण तालुक्यातील संपूर्ण दहिवडी शहर आणि त्याच्या आजूबाजूच्या वाड्यावस्त्यां प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे प्रतिबंधित क्षेत्र घोषीत करण्यात आले आहे. त्यामुळे लोकांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.अत्यावश्यक सेवा आणि वस्तू साठी काही दुकानदारांची यादी प्रशासनाने केली जाहीर केली आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र कायम राहणार आहे.
दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सातारा जिल्ह्यातील काही प्रमाणात रुग्णांची वाढ होत आहे. खबरदारीच्या उपायोजना म्हणून सातारा जिल्ह्यात रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत संचार बंदी लागू केलेली आहे, अशी माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
1 फेब्रुवारीपासून जिल्ह्याचा पॉझिटीव्ह रेट 17.02 टक्के असा असून बरे होण्याचे प्रमाण 95.15 टक्के इतका आहे. हॉटेल, रेस्टॉरंट महामार्गांवरील वगळून इतर ठिकाणी 11 नंतर बंद ठेवण्यात यावी. लग्न समारंभाला वधू कडील 50 आणि वराकडील 50 अशा 100 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येत आहे पण काही ठिकाणी याचे उल्लंघन होत आहे, असे आढळल्यास संबंधित कार्यालय व लग्न कार्यासाठी नोंदणी करणाऱ्यावर कारवाई करावी. असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जाॅईन करा
Click Here to Join WhatsApp Group