धक्कादायक! दुसऱ्याकडे पाहते म्हणून प्रेमिकेची निर्घुण हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे | प्रेमाला हक्क आणि अधिकार समजणारे अनेक लोक या पितृसत्ताक समाज पद्धतीमध्ये पाहायला मिळतात. आपल्या प्रेमींनी फक्त आपलाच अधिकार मान्य करावा! या विचाराचे हे पायीक असतात. आपली प्रेमिका अथवा प्रेमी इतर कोणाशी बोलला अथवा त्याच्याकडे पाहिले तरी, त्याच्या जोडीदाराला ते सहन होत नाही. अशीच एक घटना कल्याण जवळील सापर्डे या गावात झाली. सापर्डे या गावात एका हळदीच्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त असलेल्या महिलेची हत्या झाली होती. यानंतर फक्त चार तासांमध्ये पोलिसांनी खुनाचा उलगडा केला असून आरोपीला पकडले आहे.

अरोपीशी प्रेमसंबंध असलेली महिला दुसऱ्याकडे पाहते, याचा राग मनात धरून आरोपीने तिचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी (21 फेब्रुवारी) साडेबाराच्या सुमारास हळदी समारंभ सुरू होता. यावेळी आरोपी पवन म्हात्रे याने महिलेचा निर्घुण खून केला. या हल्ल्यामध्ये पवनची आईसुद्धा जखमी झाली आहे. पोलिसांनी जवळपास तीन तास कसून चौकशी केल्यानंतर आरोपी पवणने आपला गुन्हा मान्य केला.

डोक्यावर वार करून आरोपीने महिलेची हत्या केली. पवन आणि मृत्यू झालेली शेजारची महिला यांचे प्रेम संबंध जुळले होते. हळदी समारंभामध्ये महिला इतर पुरुषाकडे पाहते याचा पवन याचा मोठा राग आला होता. माझ्यावर प्रेम आणि दुसऱ्याकडे बघते या गोष्टीचा राग मनात धरून त्याने महिलेची हत्या केली. त्याच्याकडून एक पिस्तूल सुद्धा पोलिसांनी जप्त केले आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment