हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 ऑगस्ट रोजी पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. या मेट्रोला पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच मेट्रोचे तिकीट काढण्यासाठी स्थानकावर प्रवाशांच्या रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यावरच पर्याय म्हणून मेट्रो प्रशासनाकडून प्रवाशांसाठी ऑनलाईन तिकीट बुकिंगचे सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सेवेमुळे प्रवासी रांगेत उभे न राहता घरबसल्या मेट्रोचे ऑनलाईन तिकीट बुक करू शकतात.
ऑनलाइन तिकीट बुक कसे करावे?
1) पुणे मेट्रो प्रशासनाने ऑनलाईन तिकीट बुकिंग साठी एक वेबसाईट तयार केली आहे. ज्या प्रवाशांना ऑनलाईन तिकीट बुक करायचे आहे त्यांनी pmr.billeasy.in या वेबसाईटवर सर्वात प्रथम जावे.
2) वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला Maharashtra Metro Rail Corporation Ltd. नावाचे पेज दिसेल. या पेजवर Book Now चा ऑप्शन असेल तो क्लिक करा. तो ओपन केल्यानंतर तुम्हाला कोणत्या स्थानकावरून ते कोणत्या स्थानकापर्यंत जायचे आहे याची माहिती त्यात भरा
3) त्यानंतर तुम्हाला सिंगल की रिटर्न तिकीट हवे आहे हा पर्याय देखील निवडा. हाय पर्याय निवडल्यानंतर तुम्ही किती प्रवासी आहात याची संख्या विचारण्यात येईल तो आकडा रिकाम्या कॉलममध्ये भरा. पुढे Proceed या पर्यायावर क्लिक करा.
4) यानंतर तुमची पुढची स्लाईड ओपन होईल त्यावर तुम्हाला WhatsApp द्वारे Login करावं लागणार आहे. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी आणि पेमेंटसाठी ची लिंक व्हाट्सअप नंबरवर पाठवली जाईल. तुम्ही मेट्रो तिकीटचे पेमेंट ऑनलाइन पद्धतीने Credit Card, Debit Card, UPI करू शकता.
5) तुमचे पेमेंट सक्सेसफूल झाल्यानंतर तुम्हाला तुमचे तिकीट किंवा QR code सह उपलब्ध होईल. तसेच तुमचे तिकीट तुमच्या व्हाट्सअप नंबरवर पाठवण्यात येईल. या ऑनलाईन तिकीट पर्यायामार्फत तुम्ही मेट्रोचे तिकीट घरबसल्या काढू शकता.
विद्यार्थ्यांना विशेष सवलत
नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या पुणे मेट्रोमध्ये विद्यार्थ्यांना विशेष सवलत देण्यात आले आहे. मेट्रो प्रशासनाने विद्यार्थ्यांना तिकीट भाड्यात 30 टक्के सवलत दिली आहे. तर इतर प्रवासी या सवलतीसाठी फक्त शनिवार आणि रविवार पात्र असतील. मात्र इतर दिवशी त्यांच्या तिकिटात कोणताही सवलती दर दिला जाणार नाही. पुणे मेट्रोला फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट तसेच वनाज कॉर्नर ते रुबी हॉल पर्यंत सुरू करण्यात आले आहे.