Multibagger Stock : सोलर सर्व्हिस पुरवणाऱ्या ‘या’ कंपनीने एका वर्षात दिला 1500% नफा !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  Multibagger Stock : गेल्या काही वर्षांत शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. जर आपणही शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करत असाल आणि आपण भरपूर रिटर्न देणाऱ्या शेअर्सच्या शोधात असाल तर ही बातमी आपल्यासाठी खूप महत्वाची ठरेल. कारण आज आपण Gensol Engineering Limited या सोलर कंसल्टिंग आणि EPC सर्व्हिस पुरवणाऱ्या कंपनीच्या शेअर्सबाबत जाणून घेणार आहोत, ज्याने एका वर्षात गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. शेअर बाजारात लिस्टिंग झाल्यापासूनच या शेअर्सने गुंतवणूकदारांना 1909.15 टक्के इतका जबरदस्त रिटर्न दिला आहे.

Torrent Power picks 50-MW solar plant in Telangana for `416 cr

अहमदाबादमध्ये स्थित Gensol Engineering ही Gensol ग्रुप ऑफ कंपन्यांचा एक भाग आहे. ही कंपनी EPC आणि सोलर कन्सल्टिंग सर्व्हिस पुरवते. 1,560 कोटी रुपये मार्केट कॅप असलेली ही कंपनी भारताव्यतिरिक्त इतर देशांमध्ये सोलर प्रोजेक्ट्ससाठी टेक्निकल ड्यू डिलीजन्स, इंजीनिअरिंग, क्वालिटी कंट्रोल, कंस्ट्रक्शन सुपरविजन आणि दूसरी कन्सल्टन्सी सर्व्हिस देते. Multibagger Stock

IOC Share: शेयरहोल्डर्स के लिए आई बड़ी खुशखबरी, फ्री मिलेगा 1 शेयर, डिविडेंड भी आएगा- अब स्टॉक में क्या करें

एका वर्षात 1561 टक्क्यांची वाढ

NSE वर आज Gensol Engineering चे शेअर्स 1269.80 रुपयांवर ट्रेड करत आहेत. तसेच एका वर्षापूर्वी या शेअर्सची किंमत फक्त 76.70 रुपये होती. अशाप्रकारे, गेल्या एका वर्षात Gensol Engineering च्या शेअर्सची किंमत सुमारे 1,561.02 टक्क्यांनी वाढली आहे. Multibagger Stock

शेयर बाजार से मोटी कमाई का सपना पूरा कर रहा ये स्‍टॉक, एक साल में ही निवेशकों को दिया 500 फीसदी का रिटर्न | TV9 Bharatvarsh

या वर्षी कंपनीच्या शेअर्समध्ये बंपर वाढ झाली

वर्ष 2022 च्या सुरुवातीला या शेअर्सची किंमत 119.15 रुपये होती, जी आता 1,274 रुपये झाली आहे. म्हणजेच यावर्षी आतापर्यंत यामध्ये सुमारे 969.24 टक्के वाढ झाली आहे. जर एखाद्याने या वर्षाच्या सुरुवातीला Gensol Engineering च्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे मूल्य 969.24 टक्क्यांनी वाढून 10.69 लाख झाले असते. Multibagger Stock

सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार बनवणार

Gensol Engineering ने या वर्षी ऑगस्टमध्ये जाहीर केले की, ते देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रॉनिक कार बनवण्याच्या योजनेवर काम करत आहे. कंपनीची ही योजना यशस्वी झाल्यास, मारुतीच्या WagonR च्या किंमतीत इलेक्ट्रिक कार भारतात उपलब्ध होतील. कंपनीचे म्हणणे आहे की, इलेक्ट्रिक कारची योजना पुढे नेण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने बनवणाऱ्या अमेरिकन स्टार्टअप टेकओव्हर करणार आहे. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/gensol-engineering-ltd/gensol/542851/

हे पण वाचा :
Jio च्या 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंगसहित मिळवा 2.5GB डेटा
‘या’ Multibagger Stock ने 700 टक्क्यांहून जास्त रिटर्न देऊन गुंतवणूकदारांना केले मालामाल
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
WhatsApp चे नवे फीचर, आता लवकरच 1 हजारांहून जास्त लोकांना ग्रुपमध्ये Add करता येणार
FD Rate : ‘ही’ हाउसिंग फायनान्स कंपनी FD वर देते आहे 7.50% पेक्षा जास्त व्याज