हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । BSNL च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. BSNL कडे 797 रुपयांचा एक खूप जुना प्रीपेड प्लॅन आहे. काही दिवसांपूर्वी, BSNL कडून एकाच वेळी अनेक प्लॅनची व्हॅलिडिटी कमी करण्यात आली होती. यासोबतच एका प्लॅनची किंमतही कमी करण्यात आली होती. ज्याची किंमत 797 रुपये इतकी आहे. BSNL च्या या प्लॅनचे अनेक फायदे आहेत. मात्र याची माहिती फारच कमी लोकांना आहे. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेउयात…
बीएसएनएलच्या 797 रुपयांच्या प्लॅनचे फायदे जाणून घ्या
बीएसएनएलचा या 797 रुपयांच्या प्री-पेड प्लॅनमध्ये 300 दिवसांची व्हॅलिडिटी दिली जाते. याआधी यामध्ये 365 दिवसांची व्हॅलिडिटी दिली जात होती. या प्लॅनमध्ये डेली 2GB डेटा मिळतो, मात्र हा डेटा फक्त पहिल्या 60 दिवसांसाठीच उपलब्ध असेल. याशिवाय पहिल्या 60 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 मेसेज देखील मिळतील. तसेच उर्वरित 240 दिवस आपले सिम ऍक्टिव्ह राहते. ज्यामध्ये इनकमिंग कॉलिंगची सुविधा मिळते.
इथे हे जाणून घ्या कि, या प्लॅनचा एक या तोटा देखील आहे की, यामध्ये 300 दिवस फ्री आउटगोइंग उपलब्ध नाही. यामध्ये 60 दिवसांनंतर कॉल करण्यासाठी ग्राहकांना रिचार्ज करावे लागेल. या प्लॅनचा सर्वात मोठा फायदा असा कि, यामध्ये 300 दिवस सिम एक्टिव्ह राहील.
बीएसएनएलच्या प्लॅनची किंमत हळूहळू महागणार
BSNL कडून हळूहळू आपल्या प्लॅनच्या किंमती वाढवल्या जात आहेत. जर या प्लॅनकडे बारकाईने पहिले तर आधी जिथे 365 दिवसांची व्हॅलिडिटी मिळत होती, आता ती 65 दिवसांनी कमी झाली आहे. याशिवाय, BSNL कडून काही दिवसांपूर्वी आपल्या 107 रुपये, 197 रुपये, 397 रुपयांच्या प्लॅनच्या व्हॅलिडिटी देखील कमी करण्यात आल्या आहेत.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://portal.bsnl.in/myportal/quickrecharge.do
हे पण वाचा :
Multibagger Stock : तोट्यात असूनही टाटा ग्रुपच्या ‘या’ कंपनीच्या शेअर्सने पकडला वेग
सेबीच्या बंदीनंतर अभिनेता Arshad Warsi चे स्पष्टीकरण, ट्विटरवर लोकांना केले आवाहन
लवकरच मुंबई-गोवा मार्गावरही धावणार Vande Bharat Train, केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती
Yes Bank चे गुंतवणूकदार गोंधळात, 3 वर्षांनंतर पुन्हा पाहावे लागणार तेच दिवस ???
Amazon चा जबरदस्त डिस्काउंट !!! 20 हजारांपेक्षा कमी किंमतींत मिळवा 95 हजारांचा ‘हा’ स्मार्टफोन