कोरोनाच्या काळामध्ये विमानाने प्रवास करण्याचा ‘हा’ नियम आता बदलला, नवीन अपडेट्स काय आहे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हवाई वाहतूक मंत्रालयाने प्रवाशांनी विमानाने प्रवास करण्यासाठी भरायचा सेल्फ-डिक्लेरेशन फॉर्म हा आता अपडेट केलेला आहे. गेल्या 21 दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह नसलेल्या प्रवाशांनाच प्रवास करण्याची परवानगी मंत्रालयाने सर्व विमान कंपन्यांना दिली आहे. 21 दिवसांची ही वेळ प्रवासाच्या तारखेच्या आधीची असावी, पीटीआयने आपल्या एका अहवालात याबद्दल माहिती सांगितली आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, 21 मे रोजी हवाई वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या आपल्या अधिसूचनेमध्ये असे सांगितले गेले होते की, गेल्या 2 महिन्यांत कोविड -१९ ने पॉझिटिव्ह नसलेल्या प्रवाशांनाच केवळ प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल.

असा निर्णय का घेण्यात आला?
पीटीआयच्या अहवालानुसार, हवाई वाहतूक मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे कारण त्यांना असा विश्वास आहे की, देशातील मोठ्या संख्येने लोक कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे झाले आहेत. अशा परिस्थितीत प्रवाशांचा त्रास दूर करण्यासाठी मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. एअरलाइन्सना काही दिवसांपूर्वी सेल्फ-डिक्लेयरेशन फॉर्ममध्ये अपडेट करावयाची माहिती देण्यात आलेली आहे.

कोरोनामधून बरे होणारी व्यक्ती काही अटींसह प्रवास करू शकते
त्यात पुढे असे म्हटले गेले आहे की, जर एखाद्या व्यक्ती कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरी झाली असेल आणि गेल्या 3 आठवड्यांत त्याचा अहवाल सकारात्मक आलेला नसेल तर त्यालाही हवाई मार्गाने प्रवास करण्यास परवानगी दिली जाऊ शकते. तथापि, अशा लोकांना कोविड -१९ चे डिस्चार्ज सर्टिफिकेट दाखविणे आवश्यक होते. कोविड -१९ रिकव्हरीचे सर्टिफिकेट दाखविण्यासही परवानगी दिली जाईल. कोरोनावर उपचार केलेल्या रुग्णालयातून हे मिळू शकते.

भारतात कोरोना रिकव्हरीचा रेट 63% आहे
विशेष म्हणजे रविवारी दुपारपर्यंत भारतात 8.4 लाखांहून अधिक कोरोना विषाणूच्या संसर्गाची घटना भारतात समोर आल्या आहेत. तथापि, यापैकी सुमारे 5.15 लाख लोक यातून पूर्णपणे बरे झालेले आहेत. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने या आकडेवारीबाबत माहिती दिली आहे. ही आकडेवारी देखील दर्शवते की भारतात पुनर्प्राप्तीचा दर 63% टक्क्यांच्या जवळ आहे.

सध्या केंद्र सरकारने केवळ स्थानिक विमान कंपन्यांच सुरू करण्याची परवानगी दिली असून ती 25 मेपासून ती कार्यान्वित झाली आहे. या सेवा जवळपास 2 महिन्यांपासून रखडल्या होत्या. केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करण्यास अद्याप कोणतीही परवानगी दिलेली नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment