मुंबई प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आगामी विधानसभा निवडणूक दोन मतदारसंघातून लढणार अशी अफवा आणि बातमी सध्या चवीने चगळली जाते आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघामधून आणि मलबार हिल या मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत अशी बातमी काही वृत्तवाहिन्यांनी आणि वृत्तपत्रांनी सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. मात्र मुख्यमंत्री दोन ठिकाणी लढणार याला भाजपकडून अधिकृत दुजोरा मिळाला नाही. त्यामुळे सध्या तरी या वृत्ताला कसलेच वजन नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांचे मुख्यमंत्री पदाचे प्रतिस्पर्धी चंद्रकांत पाटील यांना शह देण्यासाठी दोन ठिकाणी निवडणूक लढणार अशी देखील अटकळ काही माध्यमांनी बांधली होती. मात्र देवेंद्र फडणवीस दोन ठिकाणी उभा राहण्याची रिस्क घेणार नाहीत. कारण राहुल गांधींचे उदाहरण ताजे असतानाच ते अशी चूक करणार नाही. तसेच ते नरेंद्र मोदी यांच्या प्रमाणे लोकप्रिय देखील नाहीत. त्यामुळे ते त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणार नाहीत.
देवेंद्र फडणवीस यांचा पारंपरिक मतदारसंघ असणाऱ्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात फडणवीसांनी तगडे काम केले आहे. त्यामुळे ते तेथूनच उमेदवारी करणार हे निश्चित आहे. राहता राहिला प्रश्न तो मलबार हिलचा तर हा मतदारसंघ मुंबई काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगल प्रभा लोढा यांचा आहे. त्यामुळे त्यांना डावलून मुख्यमंत्री येथून उभा राहतील हि शक्यता योग्य वाटत नाही.