1000 KM प्रति तास वेगाने धावणार ‘ही’ ट्रेन; मोडणार सर्व रेकॉर्ड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गतिमान दळणवळण करण्यासाठी भारताने वंदे भारत एक्सप्रेस, अमृत भारत एक्सप्रेस सुरु केली आहे. तसेच बुलेट ट्रेनचे काम अंतिम टप्प्यात आहे. एकीकडे भारतात रेल्वेची अशी प्रगती असताना दुसरीकडे चीन आपल्यापेक्षा १० पटीने पुढे आहे. चीनने नुकतीच अल्ट्रा-हाय-स्पीड मॅग्नेटिक लेव्हिटेशन (मॅगलेव्ह) ट्रेनची चाचणी घेतले आहे. आणि ही चाचणी यशस्वीही झाले आहे.आश्चर्य म्हणजे, ही ट्रेन 1000 किलोमीटर प्रति तास अशा वेगाने धावू शकते. चीनच्या सुपरसाॅनिक ट्रेनचे स्वप्न लवकरच पूर्ण होत आहे.

चीन येथील एका संशोधन ग्रुपने अल्ट्रा-हाय-स्पीड मॅग्नेटिक लेव्हिटेशन (मॅगलेव्ह) ट्रेनची चाचणी पूर्ण केली आहे. मॅगलेव्ह ही ट्रेन चीनने तयार केली असून 630 किलोमीटर प्रति तासाने चाचणी करण्यात आली असल्याची माहिती बीजिंग येथे CASIC मधील प्रकल्पाचे एक सदस्य ली पिंग यांनी दिली आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की, चीनच्या या प्रयोगामुळे डिझाइनची वैज्ञानिक तर्कशुद्धता प्राथमिकरीत्या सिध्द झाली आहे. व्हॅक्यूम निर्माण न करता मॅगलेव्ह ट्रेनचा ताशी 630 किलोमीटर प्रति तास असला तरी व्हॅक्यूम तयार केल्यानंतर या ट्रेनचा वेग ताशी 1000 होऊ शकेल, अशी आशा तेथील संशोधकांना आहे. सध्या तरी या ट्रेनबाबत पहिली पूर्ण-आकाराची सुपरकंडक्टिंग चाचणी पूर्ण करण्यात आली आहे. ही चाचणी केल्यानंतर या ट्रेनचे स्पीड 1000 किलोमीटर प्रति तास करण्याचा विचार संशोधकांचा आहे.

मॅग्लेव्ह ट्रेन एरोस्पेस सायन्स अँड इंडस्ट्री कॉर्पोरेशन लिमिटेड (CASIC) ने विकसित केली आहे. कमी व्हॅक्यूम ट्यूबमध्ये जास्तीत जास्त वेगात माल वाहतूक व प्रवाश्यांची वाहतूक केली जाणार आहे. मेगा सिटी क्लस्टर्समधील प्रवास हे या ट्रेनचे उद्दिष्ट आहे. उत्तर चीनमधील शांसी प्रांतातील दातोंग शहरात सुपरकंडक्टिंग मॅग्लेव्ह चाचणी लाइन तयार केली होती. बीजिंग येथे रविवारी (24 डिसेंबर )विज्ञान लोकप्रियीकरण प्रदर्शन आयोजित केले होते. CASIC प्रकल्पाचे सदस्य ली पिंग यांनी मॅग्लेव्ह ट्रेनबाबत माहिती दिली. सर्वप्रथम हांगझोऊ व शांघाय या शहरात ही ट्रेन सुरु करण्याचा चीनचा उद्देश आहे. चीनमधील संशोधन संघाने नॉन-व्हॅक्यूम परिस्थितीत 623km/h गतीची चाचणी केली होती. चीनमध्ये यापूर्वी हाय-स्पीड बुलेट ट्रेन्स 350 किमी/तास वेगाने चालवल्या जात होत्या . परंतु आता मॅग्लेव्ह ट्रेन बुलेट ट्रेनच्या जवळपास दुप्पट वेगाने धावणार असून या ट्रेनबाबत सर्वत्र उत्सुकता लागली आहे.