2 पाकिस्तानी दहशतवाद्यांसह RDX ने भरलेला टँकर गोव्याकडे रवाना; धमकीच्या फोनने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे. यावेळी फोन करणाऱ्या व्यक्तीने आपली ओळख पांडे अशी सांगितली आहे. आरडीएक्स घेऊन एक टँकर गोव्याच्या दिशेने निघाल्याचं सदर व्यक्तीने फोनवरून पोलिसाना सांगितलं . तसेच या टँकरसोबत दोन पाकिस्तानी दहशतवादी असल्याचीही माहिती त्याने दिली. त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली असून पोलीस यंत्रणा अलर्ट मोड वर आहे.

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात रविवारी रात्री सव्वा वाजण्याच्या सुमारास हा कॉल आला. आरडीएक्सने भरलेला एक पांढऱ्या रंगाचा टँकर मुंबईहून गोव्यासाठी निघाला आहे, त्यात दोन पाकिस्तानीही बसले आहेत असं पांडे नावाच्या व्यक्तीने सांगितलं. या धमकीच्या कॉलनंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ महाराष्ट्र एटीएस आणि गोवा पोलीस नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर संपूर्ण पोलीस दल अलर्ट मोडवर असून गोव्याच्या दिशेने निघालेल्या वाहनांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे.

या कॉल नंतर पोलिसानी रत्नागिरीत एक ट्रक अडवला परंतु हा टँकर गुजरातहून गोव्याकडे जात होता. या टँकरमध्ये पोलिसांना केमिकल्स सापडले . हे केमिकल्स पॉलिथिन बनवण्यासाठी वापरले जाते. पोलिसांना या टँकर मध्ये काहीही काहीही संशयास्पद आढळले नाही. मुंबई पोलिसांना यापूर्वी देखील अनेकदा धमकीचे फोन आले आहेत, परंतु त्यातील अनेक फोन कॉल्स हे फेक असल्याचं सुद्धा यापूर्वी समोर आलं आहे. त्यामुळे कोणीतरी पुन्हा एकदा गम्मत तर केली ना अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.