औरंगाबाद – क्रिकेटचा सामन्यावर ऑनलाइन सट्टा लावणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई बायजीपुरा भागात रविवारी करण्यात आली. रियाज सय्यद शकील, तबरेज खान कलीम खान, शेख मुजाहिद शेख फारूक असे अटकेतील सट्टेबाजांची नावे असल्याची माहिती निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.
गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांच्या पथकाला क्रिकेट सामन्यांवर ऑनलाइन सट्टा घेण्यात येत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पथकाने बायजीपुरा भागात रविवारी छापा मारला. त्यावेळी रियाज सय्यद हा घरात क्रिकेट सामन्यांवर मोबाईलच्या सहाय्याने काही वेबसाईट वर चालू असलेल्या बेटिंग वर लोकांकडून पैसे घेऊन सट्टा घेत असल्याचे आढळून आले. तो बुकिंग घेत होता. पैसे घेण्याचे काम तबरेज खान यांच्याकडे होते. त्यावरून आलमगीर कॉलनी येथून तबरेज आणि शेख मुजा इथला पकडण्यात आले.
त्यांच्या मोबाईल मध्ये ऑनलाईन जुगार खेळताना चे पुरावे मिळाले. स्थानिक लोकांकडून पैसे घेऊन सट्टा लावण्यासाठी बुकिंग घेताना सापडले. त्या वेबसाईटचा आयडी हा सद्दाम शेख यांचा असल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले. तो कमिशन देतो, असेही उघडकीस आले. गुन्हे शाखेने तिघांकडून 47 हजार 500 रुपये व 28 हजारांचे मोबाईल जप्त केले.