पाकविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने या’ तिघांना रोखले तर विजय मिळवणे सहज शक्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मेलबर्न : वृत्तसंस्था – भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी -20 वर्ल्ड कपमधील (T-20 World Cup) हाय व्होल्टेज सामना उद्या मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे. या स्पर्धेतील (T-20 World Cup) दोघांचा हा पहिलाच सामना असल्याने दोन्ही संघ आपले सर्वस्व पणाला लावून जिंकायचा प्रयत्न करतील. या दोन्ही संघातील मागच्या 5 सामन्यात भारताने 3 तर पाकिस्तानने 2 सामने जिंकले आहेत. हा सामना जिंकण्यासाठी भारताला या सामन्यातील 3 अडथळे पार करावे लागणार आहेत. तर ते 3 अडथळे कोणते ते जाणून घेऊया….

1) मोहम्मद रिझवान
यामध्ये टीम इंडियासाठी पहिला धोकादायक खेळाडू म्हणजे मोहम्मद रिझवान. आयसीसी टी20 क्रमवारीत रिझवान पहिल्या नंबरवर आहे. यंदा टी20 क्रिकेटमध्ये रिझवाननं दमदार कामगिरी केली आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो पहिल्या नंबरवर आहे. चालू वर्षात त्याने 18 सामन्यात 126 च्या स्ट्राईक रेटने आणि 55 च्या सरासरीने 821 धावा केल्या आहेत. यामध्ये 9 अर्धशतकांचा समावेश आहे. हा खेळाडू सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे मोहम्मद रिझवानची विकेट टीम इंडियासाठी खूप महत्वाची (T-20 World Cup) असणार आहे.

2) बाबर आझम
मोहम्मद रिझवाननंतर सर्वात धोकादायक खेळाडू (T-20 World Cup) म्हणजे पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम. बाबर आझमनं या वर्षात टी20 मध्ये पाकिस्तानसाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. आयसीसी क्रमवारीतही तो तिसऱ्या स्थानावर आहे. या वर्षात आतापर्यंत त्याने 19 टी -20 डावांत 132 च्या स्ट्राईक रेटने 611 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे.

3) शाहीन शाह आफ्रीदी
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी दुखापतीनंतर टी -20 वर्ल्ड कपमधून (T-20 World Cup) पुनरागमन करणार आहे. शाहीनने गेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताची आघाडीची फळी माघारी धाडली होती. त्यामुळे टीम इंडिया सुरुवातीलाच बॅकफूटवर गेली. यंदा ऑस्ट्रेलियातल्या बाऊन्सी खेळपट्ट्या शाहीन आफ्रिदीसाठी अनुकूल आहेत. त्यामुळे टीम इंडियाला या गोलंदाजापासून सावध राहावे लागणार आहे.

त्यामुळे टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी (T-20 World Cup) मोहम्मद रिझवान, बाबर आझम आणि शाहीन शाह आफ्रीदी या तीन त्रिकुटांवर वर्चस्व मिळवणे गरजेचे असणार आहे. जर हे मिळवले तरच टीम इंडिया हा सामना सहज जिंकू शकते.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय