हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या कोरोनामध्ये झपाट्याने वाढ होत असून आतापर्यंत राज्यातील 10 मंत्र्यांना आणि 20 हून जास्त आमदारांना कोरोनाची लागण झालेली आहे. हिवाळी अधिवेशनात उपस्थिती लावलेल्या दोन आमदारांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, आमदार निलय नाईक यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर ते नागपूर येथील खासगी रूग्णालयात उपचार घेत आहे. तर पुसद मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांनाही कोरोनाची लागण झाली असून ते सध्या मुंबई येथील लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. दोन्ही आमदारांची प्रकृती ठिक आहे.
सुजय विखे पाटील यांचे वडील व भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील 30 डिसेंबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. कोरोना रिपोर्ट आल्यानंतर खासदार सुजय विलगीकरणात गेले आहेत. “आज माझी कोव्हीड टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही, परंतु खबरदारी म्हणून मी स्वतः विलगीकरणात जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोव्हीड टेस्ट करावी व काळजी घ्यावी,” अशी माहिती खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली आहे.
https://www.facebook.com/drsujayvikhe/posts/3160439404185522
सध्या राजकीय क्षेत्रातील नेतेमंडळींना कोरोनाची लागण झाली असल्याने त्यांच्याकडून विविध कार्यक्रम रद्द केले जात आहेत. तसेच राज्य सरकारकडूनही ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर अनेक सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले जात आहेत.
या नेत्यांना झाली आहे कोरोनाची लागण –
आतापर्यंत राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.