नांदगाव : हॅलो महाराष्ट्र – नाशिक जिल्ह्यातील नांदगावच्या जातेगाव या ठिकाणी एक मन हेलावून टाकणारी दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये मुसळधार पावसामुळे लेंडी नदीला (Landy River) आलेल्या पुरात दोन मुली आणि एक महिला वाहून गेली आहे. वाहून गेलेल्यांपैकी दोघांचे मृतदेह सापडले तर एकाचा शोध सुरू आहे. मिना भैरव,साक्षी सोनवणे आणि पुजा सोनवणे अशी या पुरात वाहून गेलेल्या तिघांची नावे आहेत. तिघीही शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या घरी परत जात असताना लेंडी नदीला (Landy River) आलेल्या पुरात तिघेही वाहून गेल्या होत्या.
नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे नदी (Landy River) नाले तुटुंब भरू वाहण्यास सुरुवात झाली आहे. जातेगाव शिवारात झालेल्या जोरदार पावसाने जातेगाव शिवारमध्ये औरंगाबाद येथील शेतमजूर शेती काम आटपून घराकडे निघाले होते. रस्तात असलेल्या लेंडी नदीच्या (Landy River) पाण्याचा अंदाज न आल्याने त्यात 3 जणांचा मृत्यू झाला.
शेतमजूर मिनाबाई दिलीप बहिरव,साक्षी अनिल सोनवणे मयत झाले असून यांचे मृतदेह सापडले आहे. तर पूजा दिनकर सोनवणे हिचा शोध सुरू आहे. शुक्रवारी डोंगर परिसर आणि आडगाव ता कन्नड या भागाकडे मुसळधार पाऊस झाल्याने काही क्षणात लेंडी नदीला (Landy River) मोठ्या प्रमाणात पूर येऊन ही दुर्घटना घडली. सापडलेले मृत देह शवविच्छेदनासाठी नांदगाव ग्रामीण रुग्णालय पाठवले आहे. तर बेपत्ता असलेल्या पूजा दिनकर सोनवणे हीच तपास सुरू आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
हे पण वाचा :
PNB ग्राहकांना आता चेक पेमेंटच्या एक दिवस आधी बँकेला द्यावी लागणार माहिती !!!
मुंबईच्या रस्त्यावर इलेक्ट्रिक स्कूटरपाठोपाठ इलेक्ट्रिक Tata Nexon EV कारने घेतला पेट
अखेर एकनाथ शिंदे भाजपा सोबत जाणार ? ‘हा’ व्हिडिओ आला समोर
शरद पवार ऍक्शन मोडमध्ये; राज्य सरकार बहुमत सिद्ध करेल
Bank of India ने लॉन्च केली 444 दिवसांची टर्म डिपॉझिट स्कीम !!!