Satara News : शासकीय नोकरीच्या आमिषाला ‘ती’ भुलली अन् त्यांनी पावणे सहा लाखास घातला गंडा

Satara Police Station
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा शहरात सध्या शाकीय नोकरीला लावतो असे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशीच एक घटना सतत येथे घडली असून शासकीय नोकरी देतो असे सांगून महिलेची पावणे सहा लाख रुपयांची फसवणूक आणि मारहाण करून जिवे मारण्याची तीन जणांकडून धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी प्रकरणी तिघांच्या विरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. संबंधितांनी महिलेस अनोकरीला लावतो असे आमिष दाखवत तिच्याकडून पावणे सहा लाख रुपये उकळले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी एका महिलेने तक्रार दिलेली आहे. त्यानुसार अब्दूल राजकर रवाठार- शेख (रा. मिरज), तेजस्वी भास्कर चव्हाण (रा. पीरवाडी, सातारा) आणि हिना अमन अफराज (रा. करंजे सातारा) यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. जुलै 2022 ते डिसेंबर 22 च्या दरम्यान हा प्रकार घडला आहे. अब्दुल शेखने तक्रारदार महिलेकडून शासकीय नोकरी देतो असे म्हणून रोख तसेच ऑनलाइन माध्यमातून 5 लाख 87 हजार घेतले.

यादरम्यान, महिलेने पैशांची मागणी केली असताना तिला मारहाण केली तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच अत्याचारही केला, असे या तक्रारीत म्हटले आहे. सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक वाघमोडे तपास करीत आहेत.