हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । UPI ही रिअल टाइम पेमेंट सिस्टीम आहे. याद्वारे एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यामध्ये त्वरित पैसे ट्रान्सफर करता येतात. हे लक्षात घ्या कि, युपीआयद्वारे रात्री किंवा दिवसा कधीही पैसे ट्रान्सफर करता येतील.
भारतात डिजिटल पेमेंटचा ट्रेंड वाढतच चालला आहे. त्याच वेळी, UPI हा अलीकडील काही वर्षांत सर्वाधिक वापरला गेलेला डिजिटल पेमेंट मोड म्हणून उदयास आला आहे.
गेल्या काही वर्षांत युपीआयशी संबंधित फसवणूकीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र, काही सिक्योरिटी टिप्स वापरून युपीआय फसवणूक टाळता येतील.
UPI फसवणूक टाळण्यासाठी सर्वात महत्वाची टीप म्हणजे आपला युपीआय पिन कोणत्याही कस्टमर सर्व्हिस कॉल किंवा मेसेजवर कधीही शेअर करू नका.
युपीआयद्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी आपला 4 किंवा 6 अंकी युपीआय पिन वेळोवेळी बदलत राहा. अज्ञात पेमेंट रिक्वेस्ट स्वीकारू नका. युपीआयद्वारे पैसे मिळवण्यासाठी युपीआय पिन कधीही सांगू नका.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.npci.org.in/what-we-do/upi/product-overview
हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Gold Price Today : दिवाळीनंतरही सोन्या-चांदीच्या दरातील घसरण सुरूच, नवीन दर पहा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा