Google Pay आणि Paytm सारख्या टक्कर देण्यासाठी टाटा ग्रुप लॉन्च करणार डिजिटल पेमेंट अ‍ॅप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली I Amazon Pay, PhonePe, Google Pay आणि Paytm या डिजिटल पेमेंट जगतातील दिग्गज प्लॅटफॉर्मना आता लवकरच मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. मीठापासून स्टील बनवणारा टाटा ग्रुप आता डिजिटल पेमेंटच्या जगात पाऊल ठेवणार आहे. टाटा लवकरच युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI पेमेंट अ‍ॅप लॉन्च करू शकते. कंपनीला यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून मंजुरी मिळणार आहे. मंजुरी मिळताच कंपनी आपली UPI सर्व्हिस लाँच करू शकते.

द इकॉनॉमिक टाईम्समधील एका रिपोर्ट नुसार, टाटा ग्रुप देशात स्वतःची युनायटेड पेमेंट्स इंटरफेस (UPI) आधारित डिजिटल पेमेंट सर्व्हिस ऑफर करण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून मंजुरी मिळवत आहे.

टाटा ग्रुपने थर्ड पार्टी अ‍ॅप्लिकेशन प्रोव्हायडर (TPAP) म्हणून काम करण्यासाठी NPCI कडे अर्ज केला आहे. ही सर्व्हिस लवकरात लवकर सुरू करण्याचा टाटा ग्रुपचा विचार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ICICI बँकेशी संवाद साधताना
टाटा ग्रुप, आपल्या डिजिटल व्यावसायिक युनिट टाटा डिजिटलद्वारे, त्याच्या UPI पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ICICI बँकेशी चर्चा करत आहे. UPI पेमेंट प्लॅटफॉर्म, जर NCPI ने मंजूर केले तर, टाटा ग्रुपला आपल्या ग्राहकांसाठी ई-कॉमर्स एक्सपेरिअन्स वाढविण्यात मदत होईल.

असे सांगण्यात येत आहे की, टाटा ग्रुपने या डिजिटल पेमेंट अ‍ॅपला ‘टाटा न्यू’ असे नाव दिले आहे आणि अशी अपेक्षा आहे की टाटा ग्रुप पुढील महिन्यात आयपीएल सत्र (IPL 2022) दरम्यान आपले अ‍ॅप लॉन्च करू शकेल. हे अ‍ॅप युझर्सना सर्व टाटा डिजिटल अ‍ॅप्स जसे की, Bigbasket, 1MG, Croma, Tata Cliq आणि Tata Group च्या फ्लाइट बुकिंग सर्व्हिस एकाच अ‍ॅपमध्ये सहज एक्सेस करता येईल. तज्ञांच्या मते, टाटा डिजिटलची घोषणा 7 एप्रिल रोजी केली जाऊ शकते.