Indian Railway : कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी रेल्वेने सुरु केली नवी योजना !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Indian Railway : लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये कन्फर्म ट्रेन तिकीट मिळवणे वाटते तितके सोपे नाही. विशेषत: सणासुदीच्या काळात तर तिकीट मिळणेही अवघड असते. मात्र आता प्रवाशांच्या येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेकडून आरक्षणाच्या पद्धतींमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. आता रेल्वेकडून कन्फर्म तिकिटे देण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जात आहे. याबरोबरच कन्फर्म तिकीट मिळवण्याचा दुसरा रक मार्ग देखील आहे. त्याचे नाव विकल्‍प योजना असे आहे. याचा वापर करून, प्रवाशांना तिकीट बुक करताना एकाच वेळी प्रवासासाठी अनेक गाड्यांची निवड करता येईल. यानंतर ज्या ट्रेनमध्ये सीट रिकामी असेल, त्या ट्रेनमधून प्रवास करण्याची संधी मिळेल.

IRCTC VIKALP scheme extended to passengers booking tickets from counters |  Times of India Travel

प्रत्येक रेल्वे प्रवाशाला रेल्वेचे नियम आणि तिकीट बुकिंगशी संबंधित पर्यायांची माहिती असणे आवश्यक आहे. जेणेकरून प्रवासादरम्यान त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. प्रवाशांच्या सोयीसाठी, रेल्वेकडून प्रवासाच्या तारखेच्या 120 दिवस आधीच तिकीट बुक करण्याची परवानगी दिली जाते. त्याचप्रमाणे, जर एखाद्याला अचानक कुठेतरी जायचे असेल तर प्रवाशाला तत्काळ सुविधेद्वारे प्रवासाच्या एक दिवस आधीच तिकीट बुक करता येईल. Indian Railway

VIKALP: An option to bypass a waiting train ticket | Mint

VIKALP योजनेविषयी जाणून घ्या

रेल्वेने अल्टरनेट ट्रेन एकोमोडेशन स्कीमला (ATAS) VIKALP असे नाव दिले आहे. याद्वारे प्रवाशांना जास्तीत जास्त कन्फर्म तिकिटे देण्याचा प्रयत्न रेल्वे करत आहे. यामुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढेल. जेव्हा आपण ऑनलाइन रेल्वे तिकीट बुक करतो तेव्हा, VIKALP पर्याय आपोआप सुचवला जाईल. यामध्ये, ज्या ट्रेनमध्ये वेटिंग तिकीट मिळाले आहे, त्याशिवाय त्या मार्गाच्या इतर गाड्यांची निवड करण्यास सांगितले जाते. या योजनेअंतर्गत, रेल्वे प्रवाशांना ऑनलाइन तिकीट बुक करताना याचा पर्याय निवडता येईल. कोणत्याही पर्यायी ट्रेनमध्ये सीट/बर्थ उपलब्ध असेल तर त्यांनी निवडलेल्या ट्रेनमध्ये सीट/बर्थ आपोआप दिला जाईल. बुक केलेल्या तिकिट हिस्ट्रीमध्ये जाऊन हा पर्याय तपासता येऊ शकेल.Indian Railway

IRCTC Vikalp scheme for waiting-list passengers: Key things to know | Mint

7 ट्रेन निवडता येतील

VIKALP योजनेअंतर्गत 7 ट्रेन निवडता येतील. ही ट्रेन बोर्डिंग स्टेशनपासून डेस्टिनेशनपर्यंत 30 मिनिटांपासून ते 72 तासांपर्यंत धावणारी असावी. जर आपण हि योजना निवडली तर याचा अर्थ 100% कन्फर्म तिकीट मिळेल असा होत नाही. आपल्याला कन्फर्म तिकीट मिळेल की नाही हे आपण निवडलेल्या ट्रेनमधील सीटच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. मात्र हा पर्याय निवडून कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढते. Indian Railway

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://contents.irctc.co.in/en/vikalpTerms.html

हे पण वाचा :
Tax Saving Tips : आपल्या गुंतवणुकीचे अशा प्रकारे नियोजन करून वाचवा टॅक्स
Adani Group ला आणखी एक झटका !!! सिटी बँकेनंतर आता ‘या’ बँकेने देखील कर्ज देण्यास नकार
Pre-Approved Loan म्हणजे काय ??? जाणून घ्या ते घेण्याचे फायदे
Earn Money : मोबाईलवरून फोटो काढून कमवता येतील पैसे, जाणून घ्या त्यासाठीची पद्धत
Activa Electric Scooter : आपल्या पेट्रोल अ‍ॅक्टिव्हाला अशा प्रकारे बदला इलेक्ट्रिकमध्ये, त्यासाठी किती खर्च येईल ते पहा