PM Kisan Yojana चे पैसे मिळाले नसल्यास ‘या’ नंबरवर करा कॉल !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांच्या आर्थिक कल्याणासाठी अनेक योजना राबविल्या जातात. PM Kisan Yojana ही यापैकीच एक आहे. हे जाणून घ्या कि, 27 फेब्रुवारी 2023 रोजी या योजनेचा 13 वा हप्ता जारी करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत आतापर्यन्त शेतकऱ्यांच्या खात्यात 16,400 कोटी रुपयांची रक्कम ट्रान्सफर करण्यात आली आहे. जर आपणही या योजनेचे लाभार्थी असाल आणि आपल्या खात्यात या योजनेचे पैसे आले नसतील तर काळजी करण्याची काहीच गरज नाही.

PM kisan Samman Nidhi Yojana News: इस राज्य के 65 हजार से ज्यादा किसानों को  नहीं मिलेगी 2000 रुपए की किस्त, कृषि विभाग ने दी एक हफ्ते की मोहलत, ऐसे  देखें अपना नाम

हे लक्षात घ्या कि, PM Kisan सन्मान निधी योजनेशी संबंधित काही अडचण आल्यास त्याबाबत तक्रार दाखल करता येईल. यासाठी शेतकऱ्यांना हेल्पलाइनवर कॉल करून आपल्या तक्रारी नोंदवता येतील. या योजनेशी संबंधित कोणतीही माहिती मिळविण्यासाठी किंवा समस्या सोडवण्यासाठी एक हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे. याद्वारे आपल्या समस्येचे निराकरण करता येऊ शकते. याशिवाय ईमेलवरही तक्रार पाठवता येऊ शकते. सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना आपल्या तक्रारी नोंदवता येतील.

जर आपल्याला या योजनेच्या 13व्या हप्त्याबाबत काही प्रश्न किंवा तक्रार असेल तर PM Kisan Yojana चा हेल्पलाइन नंबर – 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 वर संपर्क साधता येईल. याशिवाय, [email protected] या तक्रार ईमेल आयडीवरही तक्रार मेल करता येईल.

When will 8th installment of pm kisan samman nidhi 2000 rupees come to  farmers account know mpsn | PM kisan: किसानों के खाते में कब आएगी 2000  रुपये की आठवीं किश्त? जानिए |

आपल्या खात्यामध्ये पैसे आले की नाही अशा प्रकारे जाणून घ्या

सर्वात आधी आपल्या खात्यामध्ये पैसे आले आहेत की नाही ते तपासा.
यासाठी PM Kisan Yojana च्या अधिकृत वेबसाईट http://pmkisan.gov.in वर जा.
वेबसाइटवर दिलेल्या ‘Farmers Corner’ टॅबवर क्लिक करा.
यानंतर ‘Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक करा.
येथे एक नवीन पेज उघडेल. यानंतर, आपला आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांकाचा पर्याय निवडा.
हा पर्याय निवडल्यानंतर विचारलेले तपशील भरा.
‘Get Data’ वर क्लिक करून आपल्या हप्त्याचे स्टेटस दिसेल.
इथून पैसे मिळाले की नाही हे कळेल.

PM Kisan 10th Installment Update: 4,000 rs will come in account at 15  december check your name in list here is process | PM Kisan: खुशखबरी! इस  दिन किसानों के खाते में

PM Kisan योजने बाबत जाणून घ्या

2019 मध्ये केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 11 कोटींहून जास्त शेतकरी कुटुंबे, प्रामुख्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांना 2.25 लाख कोटी रुपयांहून अधिकची रक्कम देण्यात आली आहे. PM Kisan Yojana

हे पण वाचा :
अभिनेता Arshad Warsi वर सेबीची कडक कारवाई, जाणून घ्या काय आहे प्रकरण
LIC च्या ‘या’ 3 पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून चांगल्या नफ्याबरोबर मिळवा कर सवलत !!!
Investment Tips : ‘या’ सरकारी योजनेमध्ये दरमहा फक्त ₹ 500 जमा करून मॅच्युरिटीवर मिळवा मोठी रक्कम
Business Idea : आठवड्यात 1 सौदा झाला तरी थेट 30 हजार खिशात, ‘या’ व्यवसायाद्वारे मिळवा हजारो रुपये
Bank FD : खुशखबर !!! आता ‘या’ स्मॉल फायनान्स बँकेच्या FD वर ग्राहकांना मिळणार 9.50% व्याज