हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गुन्हेगारी जगतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या शकली लढून गुन्हेगारी केली जाते. बऱ्याचदा त्यामध्ये सामान्य नागरिक ओढले जातात. अशीच एक गुन्हेगारी समोर आली आहे. यामध्ये अहमदाबाद येथील पंचवीस वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. हा तरुण महिला आणि मुलींना मोफत इनर- वियर देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून न्यूड फोटोज मागत होता. काही मुलींना यावर शंका आल्याने आणि काही मुलींना याने ब्लॅकमेल केल्या नंतर त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. त्यानंतर या गुन्हेगार तरुणाचा पर्दाफाश झाला.
अहमदाबाद येथील चांदखेडा या गावचा रहिवासी असलेल्या सुरज गवळी याला अहमदाबाद पोलिसांनी अटक केली आहे. तो मोफत इनर वेअर देण्याच्या नावाखाली महिलांची न्यूड फोटोज घेऊन फोटो घेतलेल्या महिलांना तो पैशांसाठी ब्लॅकमेल करत असे. काही महिलांनी त्याविरोधात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे फसवणूक आणि नजर ठेवण्याच्या गुन्ह्यांमध्ये त्याला अटक केली आहे. या तरुणाने एका १८ वर्षीय मुलीवर नजर ठेवली होती. त्याने या मुलीला तू मोफत इनर वेअरसाठी पात्र असल्याचं सांगत या तरुणीकडे न्यूड फोटोंची मागणी केली. तरुणीने तातडीने पोलिसांकडे धाव घेत या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. यापूर्वीही या तरुणाने अशापद्धतीने इतर महिलांना गंडा घातला असल्याचे पोलीस म्हणाले.
आरोपीला कलम ४२० फसवणूक, कलम ४०६ विश्वासघात करणे, कलम ३५४ डी नजर ठेवणे आणि कलम ५०० मानहानी करण्याच्या आरोपाखाली तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत फसवणूक केल्याने अटक करण्यात आली आहे. आरोपीने पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले असून तो ऑनलाइन ट्रेडिंग व्यवसाय करतात करत होता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.