टीम, HELLO महाराष्ट्र । जेवणात चुकून जास्त तिखट पडले तर काय करावे हा प्रश्न गृहिणींना बराच वेळा पडला असेन . काळजी करू नका तिखट जास्त झाले तरी तुमची डिश वाया जाणार नाहीये . अशा वेळी जेवणातील तिखटपणा कमी करण्यासाठी काय करावे हे आज आपण पाहणार आहोत .
१. जेवणात तिखट अधिक पडल्यास भाजीमध्ये तूप टाकल्यास तिखटपणा काही प्रमाणात कमी होऊ शकतो .
२. बटाट्याचे काप घातल्याने देखील तिखटपणा कमी होतो .
३. कढी किंवा भाजीच्या रश्यामध्ये तिखट अधिक झाले तर त्यात दही, मलाई किंवा क्रीम टाकल्याने तिखट्पणा देखील कमी होईल आणि घट्टपणा देखील येईन
४. डाळीच्या पीठाने देखील तिखटपणा कमी होतो. डाळीचे पीठ कच्चे न घालता थोडे भाजून मग घालावे .
५ .भाजीमध्ये टोमॅटोचे काप करून टाकल्यास तिखटपणा कमी होतो. टोमॅटोचे काप घालण्यासाठी प्रथम हे काप तेलावर हलके भाजून घ्या .