मुलाला वाचवायला बापाने विहिरीत उडी मारली अन् दोघेही बुडाले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विहिरीत पडलेल्या पोटच्या मुलाला वाचवण्यासाठी बापानेही उडी मारली पण वडिलांचे प्रयत्न अपुरे पडले आणि दोन्ही बाप-लेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात ही मन हेळवणारीं घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चौथीच्या वर्गात शिकत असलेला मुलगा रोहन नटराज धस हा वडिलांसोबत शेतात गेला होता. यावेळी पाणी पिण्यासाठी विहिरीत उतरला असता त्याचा पाय घसरून तो पाण्यात पडला. यानंतर त्याचे वडील नटराज धस यांनी तात्काळ विहिरीत उडी मारत मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण मुलाने त्यांच्या गळ्याला मिठी मारल्याने दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

रात्री उशिरापर्यंत दोघेही घरी न पोचल्याने नातेवाईकांनी शोधाशोध केली. तेव्हा त्यांना शेतातील विहिरीच्या बाजूला चॉकलेट, आणि चिप्स दिसले. त्यावरून दोघेही विहिरीत पडल्याची त्यांना शंका आली. नातेवाईकांनी विहिरीत गळ सोडून दोघांचेही मृतदेह बाहेर काढले.